शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

‘दौलत’ची आता विक्रीच : सहकारमंत्री

By admin | Updated: April 12, 2015 00:59 IST

कर्ज फेडून कारखाना सुरू करणे अशक्य

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्यावर ३८३ कोटींचे कर्ज आहे. नवा कारखाना ५० कोटींत उभारता येतो. त्यामुळे कर्ज फेडून पुन्हा कारखाना सुरू करणे शक्य नाही. परिणामी कर्ज भागविण्यासाठी ‘दौलत’ची विक्री करण्याशिवाय पर्याय नाही, अशी माहिती सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एका खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. परिणामी आता ‘दौलत’च्या विक्रीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘दौलत’ शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा तसेच जिल्हा बँकेने तो लिलावात काढू नये, यासाठी दौलत बचाव ठेव योजना सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कामगार व वाहतूकदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. असे एका बाजूला प्र्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मंत्री पाटील यांनी ‘दौलत’ची विक्रीच करावी लागेल, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आता दौलत बचाव कृती समिती, वाहतूकदार, कामगार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा कारखाना बंद आहे. जिल्हा बँकेचे फेब्रुवारी २०१५ अखेर ६० कोटी ७७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज कारखान्याकडून थकीत आहे. याशिवाय कामगारांचा पगार, वाहतूकदारांचे भाडे, ऊस उत्पादकांची देय बिले असे एकूण ३८३ कोटी रुपयांचे कारखान्यांवर कर्ज आहे. कर्जातून मुक्त करून धुराडे पेटविणे आव्हानात्मक आहे. दरम्यान, व्यवस्थापन आणि कंपनीने बँकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात थिटे पेपर्स कंपनीने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. बँकेला येणी वसूल करण्याचा मार्ग खुला झाला आहे. कारखाना विक्री करणे किंवा चालविण्यास घेतलेल्यांकडून कर्जाची रक्कम वसूल करणे असे दोन पर्याय बँकेसमोर आहेत. पहिल्यांदा कर्ज भरण्याच्या अटीवर कारखाना भाड्याने देण्याची निविदा काढली आहे. ९ एप्रिलपासून प्रक्रिया सुरू आहे. अजूनपर्यंत एकही कंपनी पुढे आलेली नाही. १७ तारखेपर्यंत निविदेची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी कारखाना विक्री करूनच कर्ज भागवावे लागणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे चंदगड तालुक्याच्या ‘दौलत’ची विक्री पाहण्याची वेळ उत्पादक, कामगार यांना येणार आहे. (प्रतिनिधी)