शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आता महापालिकेवर भगवा

By admin | Updated: October 30, 2014 01:08 IST

शिवसेनेचा मेळावा : कार्यकर्त्यांनी केला निर्धार

कोल्हापूर : महानगरपालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार करीत शिवसेनेने आज, बुधवारी रात्री येथे झालेल्या मेळाव्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेसोबत येण्याचे ठरविले तर आनंदच होईल. जर ते नाही आलेत तर ‘एकला चलो रे’चा नारा देत ही निवडणूक लढू, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. येत्या दहा महिन्यांत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसमोर जाऊन विश्वास संपादन करा, संघटना बळकटीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना दिल्या. गेल्या पंचवीस वर्षांतील सोबती असलेला आपला मित्रपक्ष विधानसभेवेळी आपल्यासोबत नव्हता; परंतु आता निवडणुकीनंतर पुन्हा युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष सोबत असो अथवा नसो; आपणाला मात्र सर्व ताकदीनिशी महापालिकेची निवडणूक लढवून भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी आतापासूनच हे शिवधनुष्य उचलावे, असे आवाहन क्षीरसागर यांनी यावेळी केले. शिवसेना आणि कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असल्यामुळेच माझ्यासारख्या शिवसैनिकाचा विजय झाला. दहा महिन्यांनंतर येणाऱ्या निवडणुकीतही जनता शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला. उत्तर व दक्षिण मतदारसंघांत विभागनिहाय बैठका घेऊन प्रत्येक प्रभागातून कोण-कोण इच्छुक आहेत, याचा शोध घेण्यात येईल. यशापर्यंत पोहोचणाऱ्या इच्छुकांचा शोध घेऊन आतापासूनच प्रभागात कामाला लागण्याचे आदेश आजच्या मेळाव्यात देण्यात आले. यावेळी प्रा. विजय कुलकर्णी, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, माजी उपमहापौर उदय पोवार, आदींनी आपल्या भाषणात भाजप व शिवसेनेची सत्ता येवो आणि राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली. याप्रसंगी किशोर घाडगे, व्यापारी महासंघाचे निमंत्रक सदानंद कोरगावकर, विजय पोळ, जयवंत हारुगडे, आदी उपस्थित होते. धर्माजी सायनेकर यांनी प्रास्ताविक केले, तर पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)