शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला आता नवीन गाडी

By admin | Updated: December 30, 2014 00:15 IST

शासनाचा निर्णय : जिल्हा परिषदेतील वाहन खरेदी रकमेत वाढ; आठ लाखांची खरेदी करता येणार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या नवीन वाहन खरेदीच्या मर्यादेत दोन लाख रुपयांची वाढ केली आहे. आता आठ लाख रुपयांपर्यंतचे वाहन घेण्याची मुभा मिळाल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या दिमतीला आलिशान गाडी येणार आहे. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी श. र. साबळे यांनी त्यासंबंधीचा आदेश एक डिसेंबरला काढला आहे. शासकीय अधिकारी व पदाधिकारी यांना सुरुवातीच्या टप्प्यात अ‍ॅम्बॅसडर दिली जात होती. त्यामुळे अ‍ॅम्बॅसडर दिसली की मंत्री, अधिकारी, पदाधिकारी आले, असे लोक समजत होते. मात्र, काळाच्या ओघात अ‍ॅम्बॅसडर मागे पडत आहे. नव्याने वाहन खरेदी करताना अ‍ॅम्बॅसडर वापरण्याकडे पदाधिकारी, मंत्री पाठ फिरवीत आहेत. आता अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा आलिशान वाहन खरेदीकडे कल वाढत आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना वाहन किती रकमेचे घ्यावयाचे, याची मर्यादा ग्रामविकास विभाग वित्त विभागाकडे पाठविते. यापूर्वी सहा लाखांची मर्यादा होती. सहा लाखांत अत्याधुनिक आणि आलिशान वाहन येत नव्हते. जिल्हा कार्यक्षेत्र असल्यामुळे सातत्याने फिरावे लागते. वेळेत कार्यक्रमांना हजेरी लावावी लागते. त्यामुळे आलिशान वाहन गरजेचे आहे, असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. त्यामुळे असे वाहन खरेदी करण्यासाठी मर्यादेत वाढ करावी, अशी मागणी होती. या मागणीचा विचार करून शासनाने आलिशान वाहन घेता यावे, यासाठी दोन लाखांची मर्यादा वाढविली आहे. आता आठ लाखांपर्यंत मर्यादा झाली असून, नामांकित कंपनीचे वाहन खरेदी करता येणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडे असलेल्या वाहनांचे दोन लाखांपेक्षा अधिक रनिंग झाल्यास किंवा वापरास अयोग्य असल्यास नवीन वाहन घेण्यास मंजुरी मिळते. जिल्हा परिषद स्तरावरील घसारा निधीतून शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत वाहन घेण्यासाठी पैसे दिले जातात. स्थायी समितीची मंजुरी घेऊन आयुक्तांकडे मंजुरीसाठी वाहन खरेदीचा प्रस्ताव पाठविला जातो. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर वाहन खरेदीचा आदेश दिला जातो, अशी प्रक्रिया आहे. घसारा निधी नवीन वाहन खरेदी, इंधन, कार्यालयीन इमारत यावर खर्च केला जातो. घसारा निधीत आता दोन लाखांची तूट पडणार आहे. त्यामुळे इंधन आणि कार्यालयीन इमारतीवर खर्च करताना प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागणार आहे.