शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफांच्या राजकारणाला आता उतरती कळा

By admin | Updated: February 1, 2017 23:58 IST

संजय मंडलिक : मंडलिक यांच्या बळावर मोठे होऊनही अखेरच्या क्षणी मुश्रीफांनी त्यांना एकाकी पाडले

म्हाकवे : दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या बळावर मोठे होऊनही अखेरच्या क्षणी मुश्रीफांनी त्यांना एकाकी पाडले होते. चोहोबाजूंनी अडचणीत सापडलेल्या मुश्रीफांची आता राजकीय उतरण सुरू झाल्याचा पलटवार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केला. म्हाकवे (ता. कागल) यासह परिसरातील आणुरे, बानगे, मळगे, भडगाव परिसरातील कार्यकर्त्यांचा संपर्क दौरा केला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, अंमरिश घाटगे, सदासाखरचे संचालक बंडोपंत चौगुले, ए. वाय. पाटील - म्हाकवेकर, विलास पाटील, ए. टी. पाटील, एकनाथ पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी संजय घाटगे म्हणाले, ३५ वर्षे सत्ता आम्हाला दिली आता पाच वर्षे आम्हाला सत्ता द्या, विकास काय असतो हे दाखवून देऊ, अशा वल्गना समरजितसिंह करीत आहेत. परंतु, ‘शाहू’ची सत्ता तुमच्याकडे ४० वर्षे आहे. आता कारखान्याच्या यंत्रणेचा वापर राजकारणासाठी होऊ लागल्याने राजकारणविरहीत कारभार करून कारखान्याचा आलेख वाढविण्यासाठी या कारखान्याची सत्ता पाच वर्षांसाठी आमच्याकडे द्या, असे आम्ही म्हटले तर चालेल काय? शिक्षक नेते विलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बी. डी. चौगुले, सिद्राम गंगाधरे यांनी मनोगत व्यक्त केले. आर. एस. पाटील, बाळासो रोड्डे, आकाराम पाटील, अशोक चौगुले, दिनेश पाटील, डॉ. विजय चौगुले, गजानन चौगुले, रामचंद्र चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते. नितीन पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)बेजबाबदार वक्तव्य थांबवावीत : घाटगेसंजय गांधी निराधार योजनेच्या कमिटीबाबत समरजितसिंह घाटगे यांनी बेजबादार आणि निराधार वक्तव्य करू नयेत. अपात्र लाभार्थी हे या कमिटीने केलेले नाहीत, तर ते कमिटीची स्थापना होण्यापूर्वीच राधानगरी येथील महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी करून त्यांना अपात्र ठरविले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विश्वासाला पात्र राहून या कमिटीचे काम सर्व पक्षीय आणि लोकोपयोगी असे सुरू असल्याचा निर्वाळा संजय घाटगे यांनी करताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.म्हाकवे (ता. कागल) येथील संपर्क दौऱ्यावेळी प्रा. संजय मंडलिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, विलास पाटील, बंडोपंत चौगुले, ए. वाय. पाटील, एकनाथ पाटील, ए. टी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.