शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष प्रभाग रचना व आरक्षणाकडे

By admin | Updated: November 17, 2015 00:44 IST

जयसिंगपूर नगरपालिका : मतदार नोंदणी अभियानाला प्रतिसाद

संदीप बावचे-- जयसिंगपूर -मतदान नोंदणी अभियानानंतर आता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या जून-जुलै २०१६ मध्ये प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे. दीपावलीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटीतून इच्छुक असल्याचे फटाके वाजविले आहेत. येणाऱ्या वर्षभरात जयसिंगपूरचे वातावरण निवडणूकमयच असणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासनाला कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे. याची तयारी सुरू झाली आहे. लोकसंख्येच्या आराखड्यानुसार तीन स्वीकृत असे एकूण २८ नगरसेवकांची संख्या होण्याची शक्यता आहे.दरम्यान, ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर असा मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अद्ययावतीचे काम शासनाकडून करण्यात आले. यामुळे नगरपालिका निवडणुकीचा मतदार नोंदणी कार्यक्रमाने बिगुल वाजला आहे.मतदार नोंदणी कार्यक्रमानंतर आता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या जून-जुलै महिन्यांमध्ये प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत होणार आहे.प्रभाग रचना ही शासनाकडून जाहीर होणार असून चिठ्ठी पद्धतीने आरक्षणाची सोडत येथील नगरपालिकेत होणार आहे. नुकत्याच झालेल्या दीपावलीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी प्रभागात गाठीभेटी घेऊन आपण इच्छुक असल्याचे फटाके फोडले आहेत. येणाऱ्या वर्षभराच्या काळात या ना त्या निमित्ताने इच्छुकांचे शक्तिप्रदर्शन दिसणार आहे.अभियान यशस्वीजयसिंगपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ८ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये नवीन मतदार नोंदणी, पत्त्यातील दुरुस्ती, दुबार, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे अशी मोहीम राबविण्यात आली. यात एकूण २९०० अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यामुळे हे अभियान यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्यात यापुढे ई-इलेक्शन पद्धतीने निवडणुका होण्याचे संकेत आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. आॅनलाईन अर्ज स्वीकारणे, गुगल मॅपवर प्रभाग रचना तयार करणे, प्रभागनिहाय मतदार यादी फोडण्यासाठी खास सॉफ्टवेअर, निवडणुकामध्ये अधिकाधिक संगणकीय तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न यापुढे होणार आहे.