शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील बैठकीकडे आता सर्वांच्या नजरा

By admin | Updated: August 28, 2016 00:43 IST

दोन पर्याय सरकारसमोर

कोल्हापूर : हद्दवाढ समर्थक आणि विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले असताना आणि दोन्हीही गट आपल्या मागणीवर ठाम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असून निर्णयाबाबत उत्कंठाही लागली आहे. दरम्यान, तांत्रिक कारण देत हद्दवाढीचा निर्णय प्रलंबित ठेवणे किंवा शहरालगतची आठ ते दहा गावे देऊन हद्दवाढ जाहीर करणे, असे दोन पर्याय सरकारसमोर असल्याचे सांगण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पहिल्यापासूनच सकारात्मक आहेत. वेळोवेळी त्यांनी शहराची हद्दवाढ झाली पाहिजे, अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच महानगरपालिकेकडून सुधारित प्रस्ताव मागविणे, दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या समितीकडून अहवाल मागवून घेणे, हद्दवाढ समर्थक व विरोधक यांच्याशी चर्चा करणे आणि तज्ज्ञांशी व्यक्तीश: भेटून चर्चा करणे, आदी मुद्द्यांवरून मुख्यमंत्री व पालकमंत्री सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे; परंतु तरीही सरकारने एकतर्फी निर्णय घेण्याचे टाळले आहे. मुंबईत १ आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीचा निर्णय कोणावर लादणार नाही, तो सर्वमताने घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते. तेव्हापासून दोघांनीही आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक व आमदार सुजित मिणचेकर यांच्याशी वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. हद्दवाढीच्या मुद्द्यावर दोन्ही गटांनी एक-एक पाऊल मागे येऊन समजूतदारपणाने तडजोड स्वीकारावी, अशी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांची भूमिका आहे. मुळात फडणवीस व पाटील हे दोघेही वादग्रस्त निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. एकमत करूनच निर्णय घ्यावा या विचारात आहेत. मंगळवारी मुंबईत पुन्हा दोन्ही गटांशी एकत्र चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली आहे. त्यामागचा हेतूसुद्धा हाच आहे. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत निर्णय झालाच, तर एकमताने केला जाऊ शकतो. अशी आहेत गावे... १) सरनोबतवाडी २) मुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव ५) पाचगाव ६) मोरेवाडी ७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे ९) कळंबे तर्फ ठाणे १०) उचगाव १२) वाडीपीर १३) वडणगे १४) शिये १५) शिंगणापूर १६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर. शिरोली एमआयडीसी व गोकुळ शिरगाव एमआयडीसीचाही नव्या हद्दवाढीत समावेश व्हावा, असा महापालिकेचा आग्रह आहे. मंगळवारी काय होऊ शकते? मंगळवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीत समर्थक आणि विरोधक यांना तडजोड स्वीकारण्याबाबत आग्रह धरला जाऊ शकतो. करवीर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील गावे हद्दवाढीच्या प्रस्तावातून वगळून कोल्हापूर दक्षिणमधील गावांचा समावेश करून हद्दवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. साधारणपणे आठ ते दहा गावांचा त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो. या गावांच्या विकासासाठी जादा निधी देण्याची हमी राज्य सरकार देऊ शकते. जर एकमत झालेच नाही, तर मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तांत्रिक कारण देत हा निर्णय प्रलंबित ठेवला जाऊ शकतो.