कोल्हापूर : जिल्ह्यात १५ शोरूम्स आणि १५ वर्कशॉप्ससह अविरत सेवा देणाऱ्या मारुती सुझुकीचे मुख्य अधिकृत विक्रेते साई सर्व्हिसेस आहे. त्यांच्या ‘नेक्सा’या प्रीमियम ब्रँडअंतर्गत लोन आणि एक्स्चेंज फेस्टिव्हलचे इचलकरंजीमध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अभय येलरूटे यांच्याहस्ते झाले.
यावेळी इचलकरंजी पावरलूम क्लॉथ मार्केटचे अध्यक्ष दिलीप चंगेडिया, क्रीडाईचे अध्यक्ष नितीन धूत, लायन्स ब्लड बँकचे अध्यक्ष विजयकुमार राठी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गाठ यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सुधर्म वाझे, शशी नाईक आदी उपस्थित होते. या फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना नेक्सा कार्ससाठी लोन, एक्स्चेंज सेवेचा लाभ घेता येणार आहे. नेक्सा अंतर्गत मारुती सुझुकी प्रीमियम बलेनो, अर्बन एस. यू. व्ही इग्निस, एम. पी. वी. एक्सएल ६, सिदान कार सियाज, प्रीमियम एसयुवी एस-क्रॉस या कार्स इचलकरंजी, शिरोळ, जयसिंगपूर, कुरूंदवाड, हातकणंगले परिसरातील ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे. त्वरित खरेदीसाठी फायनान्स सेवा या फेस्टिवलमध्ये ग्राहकांना मिळणार आहेत. पॉवरफूल, स्टायलिश, प्रीमियम फीचर्स, न्यू टेक्नॉलॉजी, आदी वैशिष्ट्यपूर्ण कार खरेदी करायची असेल, तर नेक्सा कार्स हा उत्तम पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कोल्हापूर रोड इचलकरंजी येथील न्यू मॉडेल हायस्कूलजवळील ‘नेक्सा फेस्टिव्हल’ला ग्राहकांनी भेट द्यावी, असे आवाहन साई सर्व्हिसेसने केले आहे.
फोटो (१००२२०२१-कोल-साई सर्व्हिसेस न्यूज फोटो) : इचलकरंजी येथील ‘नेक्सा’या प्रीमियम ब्रँडअंतर्गत लोन आणि एक्स्चेंज फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष अभय येलरूटे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डावीकडून सुधर्म वाझे, विजयकुमार राठी, नितीन धूत, डॉ. राजेंद्र गाठ, श्री. पाटील, दिलीप चंगेडिया, शशी नाईक उपस्थित होते.