शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रकृतीची खातरजमा होणार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत

By admin | Updated: September 16, 2014 23:39 IST

विधानसभा निवडणूक : सबब दिलेल्या कर्मचाऱ्यांची २० रोजी बैठक

सांगली : प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक कामकाजात सहभागी होता येत नसल्याचे सांगणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठक येत्या २0 सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कारणांची खातरजमा खुद्द जिल्हाधिकारीच करणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक कामकाज करण्यास असमर्थ असल्याची धारणा असणाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय मंडळाच्या प्रमाणपत्रासह येत्या २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. वैद्यकीय कारणामुळे निवडणूक काम करण्यास असमर्थ असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हाधिकारी कुशवाह स्वत: करणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी मतदान केंद्रावर निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना ते वैद्यकीय कारणास्तव निवडणुकीचे कामकाज करण्यास असमर्थ असल्याची धारणा आहे, त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय मंडळ यांचेकडील प्रमाणपत्र घेऊन दिनांक २० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे पाहून त्यांच्या निवडणुकीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही कुशवाह यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)बोगसगिरीला चाप!निवडणूक काम टाळण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अनेकदा बनाव केला जातो. त्यामुळेच आता आजारी असल्याचे किंवा औषधोपचार सुरू असल्याचे सांगण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्यामुळे यावेळी बोगस प्रमाणपत्रांना आळा बसण्याची शक्यता आहे.