शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: November 9, 2016 23:23 IST

नाराजीचा सूर : करारभंगमुळे कारवाईचा ससेमिरा

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -जिल्ह्यात गेल्या दशकात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे काही शेतकरी लावण केलेल्या ऊस क्षेत्राची नोंद दोन ते तीन कारखान्यांकडे करतात. परिणामी एकाच कारखान्याला हा ऊस मिळणार असून, अन्य कारखान्यांचा गाळप अंदाज चुकतो. त्यामुळे आता काही कारखान्यांनी गतवर्षी ऊस क्षेत्र नोंद केलेल्या, परंतु ऊस न पाठविलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाईचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. किंबहुना उसावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे, परंतु गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी येथील हजारो एकरांतील ऊसपीक वाळून गेले. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे येथील शेतकरी कासावीस झाला होता. पाण्याअभावी थोडे-फार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनीही भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी करार केलेल्याच कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला होता.परंतु, काही कारखानदारांनी ऊस नोंदीचा करार भंग केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. करार भंग करून आपण आमचेकडे नोंद केलेल्या उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली आहे असे सांगत या नुकसानीची रक्कम आपणाकडून का वसूल करू नये? अशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.दरम्यान, करारभंग करून उसाची अन्यत्र विल्हेवाट लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकरी ७५० रुपये वसुली नुकसानभरपाई स्वरूपात कारखानदार करणार आहेत. तसेच संबंधित शेतकऱ्याने नोटीस पोहोचल्यापासून दहा दिवसांच्या आता याबाबत लेखी खुलासा करण्याचीही संधी दिली आहे. मात्र दहा दिवसांत कोणताही खुलासा न केल्यास अथवा केलेला खुलासा प्रशासनाला असमाधानकारक वाटल्यास नुकसान भरपाईची कारवाई करणार असल्याचेही या नोटिसीत नमूद केले आहे.त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. त्या नुकसानीला जबाबदार कोण?काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीनंतर कागल तालुक्यातील कालव्यात पाणी येण्याची शक्यता दुर्मीळच होती. तसेच आमची शेतीही पठाराकडील भागातील माळरानावरील आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात १० ते १५ दिवसाला पाणी लागते. पाण्याअभावी १०० टक्के नुकसान होण्याची भीती असल्यानेच आम्ही उसाची तोड मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला. - विजय महादेव डाकवे, शेतकरी.