शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे शिक्षकांना नोटीस

By admin | Updated: October 1, 2016 00:42 IST

महापालिकेची कारवाई : ‘बीएलओ’चे काम करण्यास नकार

कोल्हापूर : बूथ पातळीवरील मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करण्यास नकार देणाऱ्या महानगरपालिका तसेज खासगी प्राथमिक शाळांतील सुमारे २५० हून अधिक शिक्षकांना महानगरपालिका प्रशासनाने ‘आपल्यावर कारवाई का करू नये,’ अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यासंदर्भात बुधवारी काही शिक्षकांनी त्यांचे खुलासे उपायुक्त कार्यालयात सादर केले. महापालिका व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पाच वर्षांतून एकदा निवडणुकीच्या काळात बूथ पातळीवर मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम दिले जात होते. संविधानातील जबाबदारी म्हणून शिक्षकांनी ही कामे केली; परंतु अलीकडे प्रत्येक महिन्याला कामे दिली जात आहेत. ज्या शाळेत त्यांची नेमणूक असेल त्याच्या बरोबर उलट्या बाजूच्या भागात त्यांना मतदार नोंदणीचे काम दिले जात आहे. हे काम करताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शिक्षकांचे मुख्य कामाकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा प्रशासनाने ही जबाबदारी शिक्षकांवर न सोपविता अन्य कर्मचाऱ्यांवर सोपवावी या मागणीसाठी शिक्षक संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने स्थगिती दिली. दरम्यानच्या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन शिक्षकांना पुन्हा मतदार नोंदणीचे काम देण्यात आले. १५ सप्टेंबरपासून हे काम सुरू करावे म्हणून महापालिका उपायुक्त विजय खोराटे व ज्ञानेश्वर ढेरे यांनी शिक्षकांना नोटिसा दिल्या. मात्र, बऱ्याच शिक्षकांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे ज्यांनी हे काम स्वीकारले नाही त्यांना नोटिसा देऊन ‘तुमच्यावर कारवाई का करू नये’ म्हणून नोटीस दिली. (प्रतिनिधी) न्यायालयाचा अवमान होईल : शिक्षकसुमारे २५० हून अधिक शिक्षकांनी बुधवारी सायंकाळी त्यांचा खुलासा दिला. ‘शिक्षक संघटनांच्या याचिकेवर असे काम देण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, सध्या निर्णय प्रलंबित असताना काम करण्याचे आदेश देणे म्हणजे न्यायालयाचा अवमान होईल,’ असे या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.