शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बार असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांना नोटीस

By admin | Updated: April 23, 2015 01:06 IST

सर्किट बेंचप्रश्नी आंदोलन : टायर पेटविल्याची हरित लवादाकडून दाखल

कोल्हापूर : सर्किट बेंचप्रश्नी केलेल्या आंदोलनात टायर पेटविल्याप्रकरणी येथील कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष विवेक घाटगे, सचिव राजेंद्र मंडलिक यांना २३ एप्रिलला लवादासमोर हजर राहून म्हणणे मांडण्याची नोटीस पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर, तज्ज्ञ सदस्य डॉ. अजय देशपांडे यांनी दिली आहे.बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सर्किट बेंचसाठी येथे अनेक दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलन सुरू आहे. १३ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीवर कोल्हापूरसह पाच जिल्ह्णांतील वकिलांनी बहिष्कार टाकला. त्या दिवशीच्या आंदोलनात लोकन्यायालयाच्या नोटिसांची पक्षकारांनी होळी करून बहिष्कार दर्शविला. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करून न्यायालयीन कामकाज बंद पाडले होते. टायर पेटविण्यात आले होते. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अध्यक्ष घाटगे, सचिव मंडलिक, उपाध्यक्ष के. व्ही. पाटील आदी वकिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतले होते. यासंबंधी बातम्या वृत्तपत्रांमध्ये छायाचित्रांसह प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावरून परिसर संरक्षण संवर्धन संस्था यांचे प्रमुख प्रकल्प संचालक रणजित गाडगीळ, निवृत्त आयपीएस अधिकारी सी. जी. कुंभार यांनी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांच्याकडे टायर पेटवून प्रदूषण केल्याची तक्रार केली. यावरून डोके यांनी यासंबंधी पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे तक्रारदारांना कळविले. दरम्यान, पुणे विभागाच्या राष्ट्रीय हरित लवादच्या निदर्शनास ही बाब आली. न्यायमूर्ती किनगावकर, डॉ. देशपांडे यांनी २७ फेब्रुवारीला उपप्रादेशिक अधिकारी, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष घाटगे, सचिव मंडलिक यांना नोटीस काढून २३ एप्रिलला पुणे लवादासमोर हजर राहून म्हणणे मांडावे. घटना घडली किंवा कसे, लवादाच्या आदेशाचा भंग का केला याबाबत प्रतिज्ञापत्र मागितले आहे. (प्रतिनिधी)आंदोलनामध्ये सहभागी घेतलेल्या सर्व वकील, सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांच्यावरील कोणत्याही कारवाईची जबाबदारी जिल्हा बार असोसिएशनने स्वीकारली आहे. लवादाने दिलेल्या नोटिसीनंतर कोणताही आदेश, शिक्षा समाजासाठी आणि सर्किट बेंचसाठी आम्ही भोगण्यास तयार आहोत.- अ‍ॅड. विवेक घाटगे, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन