शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी ‘राजाराम’ला नोटीस

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

नदीत दूषित पाणी सोडले : शिये पाणवठ्याजवळ मासे मेल्याने गंभीर दखल

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मेल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार दाखल करून पंचनामा करण्याची मागणी केली. सोमवारी तक्रारदारांसह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पूलदरम्यान नदीपात्राचा पंचनामा केला. यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने सात दिवसांत खुलासा करण्याची नोटीस कारखान्यास बजावली.शिये नदीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे मासे मेल्याचा प्रकार उघडकीस आला. उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणप्रश्नी २३ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यातच मासे मेल्याची घटना घडल्याने प्रशासनात खळबळ उडाली. दिलीप देसाई यांच्या तक्रारीवरून मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर, नायब तहसीलदार एम. ए. शिंदे, मत्स्य विभागाचे प्रतिनिधी एच. एस. जाधव, महापालिकेचे प्रतिनिधी तेजस्विनी माळी, राजाराम कारखान्याचे प्रतिनिधी नंदकुमार जाधव यांनी राजाराम बंधारा ते शिये पाणवट्यापर्यंत नदीची पाहणी केली.यावेळी केलेल्या पाहणीत राजाराम बंधाऱ्याच्या वरील बाजूस पाणी स्वच्छ असून एकही मासा मेल्याचे आढळले नाही. थोड्या अंतरावरून शियेकडील बाजूच्या नदीच्या दोन्हीपात्राच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे उघडकीस आले. नदीच्या पाण्यावर हिरवट तेलकट तवंग आढळला. राजाराम कारखान्याच्या पश्चिमेच्या बाजूस अंदाचे ५०० मीटरच्या अंतरावर असणाऱ्या उंबरमळी या भागात शेतालगत भूमिगत पाईपलाईनद्वारे राजाराम कारखान्यातून सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे पथकाला आढळले. आजूबाजूचे गवत व झुडपे जळून दूषित पाणी नदीत मिसळत असल्याची नोंद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात केली. येथील पाणी मंडळाने तपासणीसाठी घेतले तसेच राजाराम कारखान्यास जलप्रदूषण कायदा १९७४ व वायू प्रदूषण कायदा १९८१ तसेच दूषित पाणी विल्हेवाट अधिनियमन २००८ नुसार कारवाईची नोटीस कारखाना व्यवस्थापनास बजावली. सात दिवसांत कारखान्याने खुलासा करण्याचे आदेश उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी नोटिसीद्वारे दिली आहे. (प्रतिनिधी)पंचगंगा नदीपात्र क्षेत्रात पाच साखर कारखाने आहेत. आता हंगाम संपत आल्याने कारखाना धुतल्यानंतरचे पाणी नदीत सोडण्याचा प्रकार घडण्याची शक्यता आहे. ‘राजाराम’सह या उर्वरित कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी २३ एप्रिलला उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मागणी करणार आहे. - दिलीप देसाई कारखाना ३१ मार्चला बंद झाला आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही. नदी प्रदूषणाबाबत कोणतीही नोटीस कारखान्यास मिळालेली नाही. अशी नोटीस आल्यास कारखानाही त्यास कायदेशीर उत्तर देईल. - आर. सी. पाटील(कार्यकारी संचालक)