शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

नव्या आयुक्तांकडून सोमवारी बैठकीच्या सूचना

By admin | Updated: January 17, 2015 00:08 IST

आज स्वीकारणार सूत्रे : अधिकाऱ्यांत खळबळ

कोल्हापूर : महापालिकेचे नूतन आयुक्त पी. शिवशंकर उद्या, शनिवारी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र, नवीन आयुक्त प्रत्यक्ष कामास सोमवार (दि. १९)पासून सुरुवात करणार आहेत. तत्पूर्वी सोमवारी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीचे नियोजन करण्याच्या सूचना आज, शुक्रवारी नूतन आयुक्तांनी संबंधितांना मेलद्वारे दिल्या आहेत. आयुक्तांनी कोल्हापुरात दाखल होण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी २१ जानेवारीला कर्नाटक स्टाफ सिलेक्शन कमिटीच्या विभागीय संचालकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी गडचिरोली येथील सहायक जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची नियुक्ती झाली. उद्या, शनिवारी होणाऱ्या महासभेत तसेच सभेनंतर कर्मचारी व पदाधिकाऱ्यांतर्फे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर नूतन आयुक्त पदभार स्वीकारणार आहेत. प्रत्यक्ष कामास ते सोमवारपासून सुरुवात करणार आहेत. प्रत्यक्ष कामाच्या पहिल्या दिवशीच नूतन आयुक्तांनी खातेप्रमुखांची आढावा बैठक बोलावली आहे. प्रत्येक खात्याचा आढावा व वस्तुस्थितीची माहिती ते घेणार आहेत. खातेप्रमुखांनी सर्व इत्थंभूत माहितीसह बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर सर्वच विभागांत नूतन आयुक्तांना द्यावयाच्या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू होते. कार्यालयात रात्री उशिरापर्यंत धांदल सुरू होती. (प्रतिनिधी)उद्या सायंकाळपर्यंत कोल्हापुरात येत आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष कामास सुरुवात करू. कोल्हापूर शहर व परिसराबाबत अधिक माहिती नाही. यासाठीच ‘पॉवर प्रझेंटेशन’साठी खातेप्रमुखांनी सर्व माहितीसह बैठकीला येण्याबाबत निरोप दिला आहे. खातेप्रमुखांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीतून महापालिका व शहराच्या सद्य:स्थितीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष लाईन आॅफ अ‍ॅक्शन ठरविता येईल. - पी. शिवशंकर(नूतन महापालिका आयुक्त)