शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘पार्किंग’वर डल्ला मारणाऱ्यांना नोटीस

By admin | Updated: April 6, 2016 00:17 IST

आयुक्तांची कारवाई : शहरात फिरुन पाहणी केल्यावर अधिकारी धारेवर; दुकानगाळेही सील

कोल्हापूर : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापारी संकुलांतील पार्किंगच्या जागांचा अन्य कारणांसाठी वापर होत असल्याची बाब मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या निदर्शनास आली. सोमवारी (दि. ४) अचानक तीन ठिकाणी फिरती करून पार्किंगच्या जागेचा वापर कोणत्या कारणासाठी होतो याची पाहणी केली, त्यावेळी हे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पी. शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत त्यांची कानउघाडणी केली. संबंधित तीन मिळकतधारकांना नोटीस देऊन कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरात अचानक फिरती सुरू केली. त्यांनी राजारामपुरी येथील दोशी यांची मिळकत (जय हिंद), भानुदास रायबागे यांची मिळकत (एस प्लाझा), तसेच ताराबाई पार्क येथील राहुल देसाई यांच्या मिळकतीची (गोल्ड जिम इमारत) पाहणी केली असता, या इमारतीमधील पार्किंगचा वापर अन्य कारणांसाठी होत असल्याचे दिसून आले. याबाबत आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश सहायक संचालक (नगररचना) धनंजय खोत यांना दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाकडून संबंधित मिळकतधारकांना तातडीने नोटीस बजावण्यात आली असून, दंडाची आकारणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.यावेळी आयुक्तांनी केलेल्या फिरतीवेळी राजारामपुरी येथील काही इमारतींमधील दुकानगाळे भोगवटा न घेताच वापर सुरू केल्याचे निदर्शनास आले. हे दुकानगाळे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशाने परवाना विभागामार्फत सील करण्यात आले आहेत. आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी वर्गात, तसेच विनापरवाना व्यवसाय सुरू करणाऱ्या आणि पार्किंगच्या जागेचा गैरवापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडकी भरली आहे.शहरातील ज्या इमारतधारकांनी पार्किंग बंदिस्त अथवा पार्किंगचा वापर इतर कारणासाठी केला आहे, त्यांनी स्वत:हून असे अतिक्रमण काढून टाकावे; अन्यथा महापालिकेकडून अतिक्रमण काढून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आयुक्तांच्या फिरतीवेळी सहायक संचालक (नगररचना) धनंजय खोत, कनिष्ठ अभियंता हेमंत जाधव, पद्मल पाटील, परवाना अधीक्षक सचिन जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पार्किंगची जागा व्यवसायासाठीशहरातील अनेक इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत व्यवसाय सुरू आहेत. काही ठिकाणी गोदामे आहेत. त्यामुळे अशा इमारतींसमोर रस्त्यावर वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळा वर्तमानपत्रांतून त्याबाबत बातम्या छापून आल्या आहेत. तरीही विभागीय कार्यालयातील अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पार्किंगच्या जागा बंदिस्त झाल्या आहेत. आयुक्तांनी यापुढे शहरात सर्वत्र पाहणी केल्यास त्यांना आणखी अनेक इमारतींमधील अतिक्रमण दिसून येईल. त्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.