शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कागल पंचतारांकितमधील कंपन्यांना नोटीस

By admin | Updated: May 25, 2015 00:37 IST

विनापरवाना फलक : कारवाई का करू नये, अशी नगरपालिकेची विचारणा

कागल : नगरपरिषद हद्दीमध्ये विनापरवाना डिजीटल फलक उभे केल्याबद्दल कागल नगरपालिकेने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सात कंपन्यांकडे कारवाई का करू नये, याबद्दलचा लेखी खुलासा मागितला आहे. कागल बसस्थानक आवारातही भव्य फलक उभारल्याबद्दल एस. टी. महामंडळासही अशी नोटीस बजावली आहे.नगरपालिका हद्दीत शहरामध्ये असे डिजीटल फलक लावून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा येऊ नये, सार्वजनिक मालमत्तेबरोबरच खासगी मालमत्तेचे विद्रुपीकरण होऊ नये, जनतेला नाहक त्रास होऊ नये, या उद्देशाने शासनाने आता अशा डिजीटल फलकांबद्दल कडक धोरण स्वीकारले आहे, तर याबद्दल उच्च न्यायालयाकडे दर चार महिन्यांना सर्वच नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि कर निरीक्षकांना अहवाल सादर करून प्रतिज्ञापत्रही द्यावे लागते. या अनुषंगाने कागल नगरपरिषदेने येथील लक्ष्मी टेकडीजवळ नगरपालिका हद्दीत विनापरवाना फलक उभे केलेल्या किर्लोस्कर आॅईल्स, मेट्रो हायटेक, इंडोकाऊंट, विराज सिटी, एफ. एम. टेक्सटाईल, रेमण्ड, मेनन, सोकटॉस या कंपन्यांना या नोटिसा पाठविल्या आहेत, तर बसस्थानक आवारात एस. टी. महामंडळाने विविध कंपन्यांच्या जाहिरातीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, कागल शहराच्या हद्दीत येणाऱ्या कोणत्याही जाहिरातीवर नगरपालिका कर बसतो म्हणून विनापरवाना हे फलक लावल्याबद्दल एस. टी. महामंडळालाही नगरपालिकेने कारवाईची नोटीस बजावली आहे. डिजीटल फलकाबद्दलच्या या नव्या धोरणात डिजीटल फलकावरच नगरपालिकेने दिलेला परवाना क्रमांक छपाई करणे बंधनकारक आहे. शहरातही जर असे फलक उभे केले असतील, तर त्याची माहिती देण्यासाठी १८००२३३१२२३ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभागनिहाय समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामुळ या फलकांची माहितीही लगेच मिळणार आहे. (प्रतिनिधी)फौजदारी दाखल करण्याची तरतूदविनापरवाना जाहिरात कर चुकवून असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हेही दाखल करू शकते. कागल नगरपालिकेने सात कंपन्यांवर ही कारवाई सुरू केली आहे; पण शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध फलकांच्या बाबतीत हेच धोरण स्वीकारणार काय? हा खरा प्रश्न आहे.