शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’बाबत आयुक्तांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 01:23 IST

महासभेचा ठराव रद्दची मागणी : उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडीवेळी निकष बाजूला ठेवून निवडीबाबत महासभेला शिफारस केल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह विभागीय आयुक्त व राज्याच्या नगरविकास विभागास अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी नोटिसा बजावल्या. हा महासभेचा ठराव रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे शहर अध्यक्ष सुरेश पोवार यांच्यावतीने या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिकेत खळबळ माजली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडी वादग्रस्त ठरल्या आहेत. नव्या सभागृहात या निवडी करताना कायद्याच्या कीस पाडण्यात आला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपामध्ये या निवडी पार पडल्या; पण या निवडीवेळी सुनील कदम यांनी आपल्यावर नाहक आरोप करून डावलण्यात आल्याची लेखी तक्रार आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान, सोमवारी सुरेश पोवार यांच्यावतीने अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी आयुक्त पी. शिवशंकर, विभागीय आयुक्त तसेच नगरविकास विभाग यांना खुलासा करण्याबाबत नोटिसा बजावल्या. या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडी करताना सनदी लेखापाल, वकील, इंजिनिअर, निवृत्त मुख्याध्यापक, निवृत्त प्राध्यापक अगर एखाद्या सामाजिक संस्थेचा पदाधिकारी असणे आवश्यक आहे. असे निकष असताना आयुक्तांनी महासभेमध्ये फक्त सामाजिक संस्थेचा पदाधिकारी याच एका निकषावर स्वीकृत नगरसेवकपदासाठी केलेल्या शिफारशी चुकीच्या असल्याचे मत मांडले आहे. याशिवाय या पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेता येत नसताना निवडणूक घेण्यात आल्याचा चुकीचा निकष लावल्याचेही या नोटिसीमध्ये म्हटले आहे. या महासभेमध्ये ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. त्यामुळे महासभेने केलेला ठराव सरकारने तो रद्द करावा, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. जर महासभेने स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत केलेला ठराव रद्द न केल्यास त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचाही इशारा या नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. सुनील कदम यांनी आयुक्तांना कागदपत्रे दिली सुनील कदम यांनी सोमवारी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन पोलिसांच्या चार्टशिटमध्ये आपले नाव नसल्याची कागदपत्रे त्यांना दिली. ही कागदपत्रे शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)