शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती देणाऱ्या ३७ शिक्षकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:57 IST

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची ...

कोल्हापूर : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाºया जिल्ह्यातील ३७ प्राथमिक शिक्षकांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये अनेकांनी ‘सोयीची बदली’ व्हावी यासाठी चुकीची माहिती भरल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºयासंवर्गामध्ये ‘सुगम दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्णातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आले आहेत. यातील सकृतदर्शनी दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी गुरुवारी ‘कारणे दाखवा नोटिसा’ काढल्या आहेत.तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली असून बदली होऊन आलेल्या सर्व तालुक्यांतील शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांत ही छाननी करून याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल डॉ. खेमनार यांनी मागवला आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.खोटी माहिती देणाºयांचेधाबे दणाणले‘आॅनलाईन माहिती भरली तर कोण विचारतोय,’ अशा आविर्भावात अनेकांनी चुकीच्या माहितीच्या आणि दाखल्यांच्या आधारे आपल्या बदल्या सोयीच्या कशा होतील याची जोडणी घातली. मात्र, आता दाखले कुणी दिले येथूनच चौकशी होणार असल्याने आणि चुकीची माहिती भरल्याने कारवाई अटळ मानली जात असल्याने अशांचे धाबे दणाणले आहे.