शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

जनता बझारच्या १७ संचालकांना नोटीस

By admin | Updated: April 21, 2016 00:38 IST

जिल्हा उपनिबंधकांची कारवाई : पंधरा दिवसांत खुलासा करण्याची मुदत

कोल्हापूर : चुकीच्या पद्धतीने कामकाज करून संस्था आर्थिक डबघाईला आणली तसेच सरकारी, व्यापारी, कर्मचाऱ्यांची देणी थकविली, सहकाराचे हित जोपासण्याऐवजी खासगी व्यक्तींच्या हितास प्राधान्य दिल्यामुळे संस्थेच्या हिताची पायमल्ली करण्यात आली म्हणून सहकार कायदा कलम ७८ (१) अन्वये येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-आॅप कंझ्युमर्स स्टोअर्स तथा जनता बझारच्या १७ संचालकांना बुधवारी ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी या नोटिसा बजावल्या असून १० मे रोजी दुपारी तीन वाजता सर्व संचालकांनी सुनावणीस उपस्थित राहून त्यांचे म्हणणे सबळ पुराव्यांनिशी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जर संबंधित संचालकांनी त्यांचा खुलासा मुदतीत सादर केला नाही तसेच त्यांच्या खुलासा कायदेशीर अथवा समाधानकारक नसल्यास संस्थेच्या संचालकपदावरून कमी करणेबाबत पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यानोटिसीमध्ये देण्यात आला आहे. सतरा संचालकांसह अन्य तीन व्यक्तींना अशी नोटीस बजावण्यात आली आहे. जनता बझारच्या सन २००८ ते २०१२ या आर्थिक कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण, विशेष लेखापरीक्षण सहकारी संस्था(ग्राहक) यांच्यामार्फत करण्यात आले आहे. संस्थेच्या महत्त्वाच्या व गंभीर बाबींचा प्रशासकीय कारवाईचा अहवाल त्यांनी उपनिबंधक कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली असून सर्व संचालकांवर एकूण १३ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. संचालकांनी संस्थेच्या हितापेक्षा खासगी व्यक्तींचे हित पाहिले आहे. भाडे, कमिशन बेसीसवर संस्थेतील दुकानगाळे चालविण्यास देऊन सहकार तत्त्वाचे हित जोपासण्याऐवजी खासगी व्यक्तींचे हित जोपासून सभासदांची दिशाभूल केली. बारदान विक्री दरास संचालक मंडळाची परवानगी घेण्यात आली नाही. बारदान विक्री शिल्लक माल रक मेचा जमा-खर्च वेळच्यावेळी करण्यात आला नसल्याने संस्थेला अनुक्रमे १,६१,३१२ व १,८०,७०० रुपये तोटा झाला. सभासदांची ग्रॅच्युएटी देण्यासाठी ३६,९६,०११ इतक्या रकमेची तरतूद केली नाही. खासगी दुकानदारांनी अंतर्गत केलेल्या दुरुस्त्यांना संस्थेची रितसर परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे कराराचा भंग झाला आहे. दुकानदारांना भाड्याने जागा देताना महानगरपालिकेची परवानगी घेतली नाही. घरफाळा, भुईभाडे, लाईट, पाणी बिल संबंधितांना भरणे आवश्यक असताना ते संस्थेला सोसावे लागले. इतकेच नाही तर शाखा बंद झाल्यामुळे मिळणारे उत्पन्नही बंद झाल्याने संस्थेचे नाहक नुकसान झालेले आहे, असे आक्षेप ठेवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी) नोटीस देण्यात आलेले संचालक..नोटीस देण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, माजी उपमहापौर उदय पोवार, अरुण साळोखे, राजेश पाटील, उदयकुमार देसाई, बाळासाहेब कुंभार, अनंत सरनाईक, सुदाम चौगुले, प्रकाश बोंद्रे, शामराव शिंदे, सुधा शांताराम चव्हाण, तानाजी साजणीकर, शिवाजी घाटगे, मदन चोडणकर, प्रकाश खुडे, स्नेहलता पाटील, ललिता माळी, गजानन काशीद, नीरज जाजू, आनंदराव फडतारे, आदींचा समावेश आहे.