शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार

By admin | Updated: November 11, 2016 00:50 IST

‘आरबीआय’ने दिली परवानगी : मात्र पहिला दिवस गेला गोंधळात

जिल्हा बँकेतही नोटा बदलून मिळणार‘आरबीआय’ने दिली परवानगी : मात्र पहिला दिवस गेला गोंधळातकोल्हापूर/पुणे/मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेत इतर बँकांप्रमाणेच पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार असून, खातेदारांना आपल्या खात्यात या नोटा भरता येतील, असा निर्णय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) घेतला आहे. मात्र, पतसंस्थांना हा निर्णय लागू नसल्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले. पैसे बदलून देण्यास खासगी व सरकारी बँकांत सुरुवात झाली. मात्र, त्यात आरबीआयने जिल्हा मध्यवर्ती बँकांचा समावेश केला नव्हता. गुरुवारी अनेकांनी जिल्हा बँकांमध्ये गर्दी केली होती. ही बाब सहकार आयुक्तांच्या लक्षात आल्यानंतर आरबीआयशी संपर्क साधला. आरबीआयने गुरुवारी सुधारित पत्रक काढत जिल्हा मध्यवर्ती बँकेला पैसे बदलून देण्याची मुभा दिली. नव्या धोरणामुळे गुरुवारी कमी रकमेचे वाटप : प्रतापसिंह चव्हाणकोल्हापूर जिल्हा बँकेच्या जिल्ह्यात १९१ शाखा असून, त्यामधून सुमारे ६० कोटी रुपयांचा बॅलन्स असतो; परंतु रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार शंभर रुपयांच्याच नोटांचे वाटप करायचे असल्याने गुरुवारी कमी रकमेचे वाटप झाल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.रिझर्व्ह बँकेकडून पुरेसा चलन पुरवठारिझर्व्ह बँकेचे चलन पुरविण्याची सुविधा स्टेट बँक व रत्नाकर बँकेकडे आहे. या बँका आपल्याला हवी तेवढी कॅश ठेवून घेऊन राहिलेली कॅश जिल्हा बँकेला देत असत. त्यामुळे जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये पुरेशी कॅश नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. त्याबद्दलही रिझर्व्ह बँकेपर्यंत तक्रारी झाल्या. त्यानंतर आता जिल्हा बँकांनाही पुरेशा स्वरूपात चलन उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)स्पष्ट आदेश नसल्याने काही जिल्हा बँकांनी राज्य शिखर बँकेशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले. जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेने ८ नोव्हेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हा बँकांचा नामोल्लेख नसल्याचे कळविले.केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याचे कारण पुढे करत, या बँकांनी नोटा स्वीकारू नयेत, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले. त्यानुसार राज्य शिखर बँकेने तसा ई-मेल सर्व जिल्हा बँकांना पाठविला. त्यानंतर व्यवहार थांबविण्यात आले. मात्र, दुपारनंतर त्यात दुरुस्ती झाली.नामोल्लेख नसल्याने झाली पंचाईतराज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या 3746 शाखा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे उघडल्यानंतर ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. काही जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारून त्याबदल्यात नव्या नोटा ग्राहकांना देऊ केल्या.राज्यातील पतसंस्थांना अजूनही पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारता येणार नाही. राज्यात पंधरा हजार पतसंस्था आहेत. त्यांनाही नोटा बदलून देण्यास परवानगी दिल्यास अधिक नागरिकांपर्यंत पोहोचता येईल. तसेच या यंत्रणेची मोठ्याप्रमाणावर मदत होईल. पतसंस्थांना अशी परवानगी दिल्यास इतर बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होईल. तशी मागणी आरबीआयकडे करण्यात आली असल्याची माहिती दळवी यांनी दिली. रिझर्व्ह बँकेच्या आदेशात जिल्हा बँकांचा उल्लेख नसल्याने नोटा स्वीकारणे बंद केले होते. मात्र, उद्यापर्यंत सुधारित आदेश येऊन व्यवहार सुरळीत होतील.-प्रमोद कर्नाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य शिखर बँक