शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहनतळ नव्हे; पैसे वसुलीचा अड्डा

By admin | Updated: November 24, 2014 23:59 IST

बिंदू चौक पे अँड पार्क : कमाई लाखात; मात्र सुविधांचे तीनतेरा, शौचालय, डांबरीकरणाचा अभाव, सुरक्षितता रामभरोसे

एकनाथ पाटील - कोल्हापूर -अंबाबाई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर वाहनतळ असल्याने याठिकाणी भाविकांची वाहने पार्किंग करण्यासाठी मोठी गर्दी असते. तासाला तीस रुपयांप्रमाणे भाडे आकारून लाखो रुपये ठेकेदाराच्या पदरात पडत असताना याठिकाणी सुविधा मात्र शुन्य आहेत. शौचालय नाही, की डांबरीकरण नाही, वाहनांची सुरक्षितता रामभरोसे अशा गंभीर परिस्थितीत भाविकांकडून फक्त पैसे उकळण्याचे काम येथील ठेकेदार करीत आहे. पाच मिनिटे जादा वेळ गाडी थांबून राहिली तरी तासाचे भाडे आकारण्यासाठी वसुली करून भाविकांना वेठीस धरले जात आहे. अनेकवेळा याठिकाणी वादावादीचे प्रसंग घडत असूनही महापालिका व पोलीस प्रशासन मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी नेहमी भाविकांची गर्दी असते. बहुतांशी परजिल्ह्यांतील भाविक आपली वाहने बिंदू चौक येथील वाहनतळावर पार्किंग करतात. या वाहनतळाचे सर्वाधिकार महापालिकेच्या परिवहन विभागाकडे आहेत; परंतु त्यांनी वाहनतळाचा ठेका करार पद्धतीवर खासगी ठेकेदाराला दिला आहे. येथील ठेकेदार मात्र भाविकांच्या वाहनधारकांसाठी कोणतीही सुविधा न देता त्यांच्याकडून तासाला ३० रुपयांप्रमाणे भाडे आकारण्याचे काम सुरू आहे.ठेकेदाराचे कर्मचारी झाडाखाली खुर्ची टाकून डोळ्यावर गॉगल लावून बसलेले असतात. त्यांचे बोलणे, वागणे गुंडांसारखे असल्याने भाविक काही न बोलता गाडी पार्किंग करून जात असतात. दर्शन घेऊन परततात त्यावेळी जितका वेळ गाडी उभी आहे तेवढ्या वेळेचे भाडे त्यांच्याकडून आकारले जाते. काहीवेळा भाडे कमी करण्यासाठी भाविक विनंती करतात; परंतु वसुली कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत सक्तीने वसुली करून घेतात.पाच मिनिटे उशीर झाला, तरी तासाचे भाडे आकारले जाते. त्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी धक्काबुक्कीही केली जात असल्याच्या तक्रारी भाविकांच्या आहेत. हे कर्मचारी याच परिसरातील रहिवासी असल्याने त्यांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिकेच्या निविदेमध्ये वाहनतळ सर्वसुविधांयुक्त असावे, असा नियम आह; परंतु याठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही, शौचालय-मुतारी नसल्याने काही भाविक वाहनांच्या आडोशाला लघुशंकेसाठी व शौचालयास बसतात. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या वाहनतळाला लागून बिंदू चौक कारागृह व नागरी वस्ती आहे. येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यामध्ये याठिकाणी चिखलामध्येच पार्किंग करावी लागतात. काहीवेळा येथील दुरवस्था पाहून काही भाविक बिंदू चौक सर्कलच्या बाजूला पार्किंग करतात. अशावेळी पार्किंग वसुली कर्मचारी वाहतूक पोलिसांना फोन लावून वाहने उचलण्यासाठी सांगतात.भाड्यापाठोपाठ कमिशनही येथील पार्किंगचा ठेका अंदाजे २५ ते ३० लाखांपर्यंत दिला जातो. दिवाळी, दसरा, गणपती, मे महिन्याच्या सुटीमध्ये भाविकांची गर्दी असल्याने याठिकाणी दिवसाला ७० हजार रुपयांची कमाई होत असते. त्यामुळे या वाहनतळाचा ठेका मिळविण्यासाठी चढाओढ नेहमीच सुरू असते. वाहनतळ परिसरात असणाऱ्या चहागाड्यांचे महिन्याला कमिशन ठरलेले आहे. ते न चुकता संबंधित ठेकेदाराला दिले जाते. त्याचबरोबर काही लॉजिंग, हॉटेलमधील एजंटांचाही वावर याठिकाणी आहे. एखादी गाडी पार्किंग होताच त्यांच्या मागोमाग जाऊन आपल्या हॉटेल किंवा लॉजिंगवर त्यांना राहण्यासाठी सक्ती केली जाते. या एजंटांकडूनही ठेकेदार कमिशन घेत असल्याचे समजते. भाडेवसुली करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे, तर याठिकाणी सुविधा पुरविण्याची जबाबदारी कोणाची? यावर मात्र कोणीच उत्तर देत नाही.