शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

निवडणूक न लढविणे म्हणजे राजकीय संन्यास नव्हे : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:40 IST

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आगामी काळात कोणतीही निवडणूक लढविणार नाही’ असे म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १२ तासांत आपला ‘शब्द’ फिरविला. ‘निवडणूक लढवणार नाही, याचा अर्थ राजकीय संन्यास घेणार असा होत नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.राज्यातील दुसºया क्रमांकाचे नेते आणि भाजपमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी ...

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आगामी काळात कोणतीही निवडणूक लढविणार नाही’ असे म्हणणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १२ तासांत आपला ‘शब्द’ फिरविला. ‘निवडणूक लढवणार नाही, याचा अर्थ राजकीय संन्यास घेणार असा होत नाही,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.राज्यातील दुसºया क्रमांकाचे नेते आणि भाजपमधील बडे प्रस्थ असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापुरातील पोलीस दलाच्या गणराया अवॉर्ड वितरणावेळी बोलताना आपण आगामी विधानसभा, लोकसभाच काय विधान परिषदेची निवडणूकही लढविणार नाही, असे वक्तव्य केले होते. मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी असलेली जवळीक सर्वांनाच माहीत आहे.गेल्यावर्षी गणेशोत्सवात साऊंड सिस्टीम लावण्याला मंत्री पाटील यांनी विरोध केला होता, तर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी गणेश मंडळांच्या बाजूने भूमिका घेतली होती. ‘माझ्या अशा भूमिका राजकीय हेतूंनी कधीच नसतात,’ असे सांगताना मंत्री पाटील यांनी ‘राजेश क्षीरसागर यांना निवडणूक लढवायची आहे. मला तीही लढवायची नाही. एवढेच नव्हेतर ‘इथे पत्रकारही आहेत, त्यांनी हे छापून टाकावं,’ असे म्हटले. मात्र, आपण भावनेच्या भरात जे बोललो ते गांभीर्याने घेतले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेणार नसल्याचे स्पष्ट करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.