नूल : म्युकरमायकोसिसने येथील तरुणाचा मृत्यू झाला. किसन सीताराम माने (वय ३८) असे त्याचे नाव आहे. ‘म्युकर’चा तो गडहिंग्लज तालुक्यातील पहिला बळी ठरला.
गेल्या काही दिवसापासून किसन हा आजारी होता. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, त्याला ‘म्युकर’ने गाठले. त्यामुळे त्याचा डावा डोळा निकामी झाला. त्यानंतर मंगळवारी (२०) मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिणी असा परिवार आहे.
१ एप्रिल ते आजअखेर नूलमध्ये १५४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढल्यामुळे आठवडाभर गावात कडक लॉकडाऊन पाळण्यात आला आहे.
कुटुंबाचा आधार हरवला..!
पंधरा वर्षांपूर्वी एकुलत्या किसनच्या वडिलांचे निधन झाले आहे. तेव्हापासून वयोवृद्ध आई आणि विधवा बहीण व तिच्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावरच होती. ट्रॅक्टर चालकाचे काम करत कुटुंबाचा गाडा ओढत होता. त्याच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार हरवला आहे.
चौकट :
७ जुलैला नूल येथील ९ वर्षांच्या बालिकेचा कोरोनाने मृत्यू झाला. कोराेनाच्या मृत्यूची ती जिल्ह्यातील पहिली बळी ठरली. त्यापाठोपाठ ‘म्युकर’ने किसनचा बळी घेतला. त्यामुळे नूलसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
किसन माने : २१०७२०२१-गड-०९