शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलन व्यापारी-उद्योजकांचा निर्णय

By admin | Updated: May 15, 2014 01:03 IST

कोल्हापूर : ‘एलबीटी’ विरोधी व्यापार्‍यांनी तीव्र लढा उभा केला आहे. त्यातच आज, बुधवारी ‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलनाचा निर्णय झाला.

कोल्हापूर : ‘एलबीटी’ विरोधी व्यापार्‍यांनी तीव्र लढा उभा केला आहे. त्यातच आज, बुधवारी ‘एलबीटी’ विरोधात असहकार आंदोलनाचा निर्णय झाला. याची आजपासूनच (बुधवार) अंमलबजावणी सुरू झाली आहे. व्यापारी मित्र संघटनेतर्फे पुणे मर्चंट चेंबर येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी ‘फाम’ संघटनेचे अध्यक्ष मोहन गुरनानी होते. बैठकीला राज्यातील २६ पैकी १८ महापालिका क्षेत्रातील व्यापारी व उद्योजक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर प्रतिनिधींनी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. बैठकीत यापूर्वीच्या आंदोलनाचा आढावा घेण्यात येऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. सर्व व्यापार्‍यांनी ‘एलबीटी’विरोधी तीव्र भूमिका कायम ठेवावी व ‘फाम’ संघटनेच्या आदेशानुसार पुढील आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय झाला. याचाच एक भाग म्हणून आजपासून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले. याला उपस्थित प्रतिनिधींशिवाय अनुपस्थित महापालिका क्षेत्रातील व्यापारी, उद्योजकांनीही सहमती दर्शविली आहे. त्यानुसार महिन्याला फक्त १० रुपये इतकी ‘एलबीटी’ भरण्याचे ठरले. याबाबतीत सर्व व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती अभियान राबविण्याचे ठरले. सांगली येथे येत्या आठ दिवसांत पुढील बैठक होणार आहे. बैठकीला खासदार गजानन बाबर, प्रदीप कापडिया, अमर क्षीरसागर, संजय रामचंदानी, हर्षद शहा, प्रफुल्ल संचेती, राजू राठी, अजित कोठारी, अजित मेहता, विक्रम निसार, सुरेश जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)