शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅश’ शॉर्ट फिल्मला नामांकन

By admin | Updated: April 21, 2016 00:39 IST

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव : सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : दिल्लीमध्ये ३० एप्रिलला दादासाहेब फाळके (भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक) यांच्या जयंतीनिमित्त चित्रपट महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये आपल्या कोल्हापूरमधील ‘अ‍ॅश’ या शॉर्ट फिल्मला नामांकन मिळाले आहे. या महोत्सवामध्ये अमेरिका, आॅस्ट्रेलिया, इटली, स्पेन, जपान, जर्मनी, इराण, लंडन, रशिया, फान्स, मेक्सिको अशा जगभरातून जवळजवळ ९०० फिल्मस् शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या. त्यामधून ‘अ‍ॅश’ या शॉर्ट फिल्मने पुणे, औरंगाबाद, बीड, मुंबई, दिल्ली, गोवा येथे अनेक नामांकने मिळवलेली आहेत. तसेच विदेशामध्येही अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी दाखल झाली आहे. ‘अ‍ॅश’ या शॉर्ट फिल्मची संकल्पना -निर्माता - दिग्दर्शक उदय राजाराम पाटील यांची आहे. या फिल्मविषयी बोलताना उदय राजाराम पाटील म्हणाले, ही शॉर्ट फिल्म ‘चेन स्मोकर’वर बेतलेली कथा आहे. आपण आपल्या आजूबाजूला, सार्वजनिक ठिकाणी आपण पाहतो, आजची तरुण पिढी बिनधास्त सिगारेट ओढत असतात. त्यांच्या आजूबाजूला ‘नो स्मोकिंग’चे फलक लावलेले असतानादेखील किंवा सिगारेट पाकिटावर देखील लिहिलेले असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि भविष्यात त्यांना कॅन्सर, हार्ट अटॅक, अशा रोगांना सामोरे जावे लागते आणि अगदी जिवावर बेतल्यावर सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतात; पण त्यावेळी कदाचित ती वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच या शॉर्ट फिल्ममधून दिग्दर्शकाने एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सिगारेट ओढणाऱ्यांनो, आजच सावध होऊन सिगारेट सोडा. विषाची परीक्षा पाहू नका. या शॉर्ट फिल्ममध्ये एकही कलाकार किंवा संवाद नसून दृश्यांच्या माध्यमातून ही कलाकृती साकारली आहे. या शॉर्ट फिल्मचे सहनिर्माते-असोसिएट दिग्दर्शक अशोक बापू कांबळे आहेत. छायांकन - विलास चौगुले, संकलन - सलोनी कुलकर्णी, पार्श्वसंगीत - रवी सुतार यांचे आहे. या शॉर्ट फिल्मसाठी प्रदीप राठोड सेठ, अरुणकुमार भोसले (सरकार), सचिन सुग्रीव जाधव, विलास पाटील, वैभव जकाते यांचे सहकार्य लाभले. भविष्यात सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर आणखी लघुपट बनविणार आहे. यातून सामाजिक प्रबोधन करण्याचा आपला प्रयत्न राहील.