शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

मनपाचे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

By admin | Updated: September 5, 2015 00:13 IST

बावड्यात आज वितरण : खासगी शाळांसह १३ जणांची निवड; दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा होणार गौरव

कोल्हापूर : शालेय शिक्षणात महत्त्वाचा पाया असणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील आठ, तर खासगी प्राथमिक शाळांतील पाच शिक्षकांना आज, शनिवारी शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच मेहनतीने झाडलोटसह शिक्षणाचे काम करणाऱ्या दोन सेवकांनाही यंदापासून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पुरस्कार वितरण आज शुक्रवारी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज सभागृह, लाईन बाजार, कसबा बावडा येथे वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपसभापती भरत रसाळे, समीर घोरपडे, अशोक पोवार, प्रभारी प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे, आदी उपस्थित होते. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे मनपा शाळा : विजया वसंतराव चव्हाण (प्राथमिक शिक्षण मंडळ, पर्यवेक्षिका), सुनील श्रीकांत गणबावले (मुख्याध्यापक, आण्णासाो शिंदे विद्यांमदिर, लक्षतीर्थ), महेश म्हाकू ठोंबरे (सहायक शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर, कदमवाडी), कृष्णात बाबासाो पाटील (सहायक शिक्षक, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर, जरगनगर), दीपक नामदेव कुंभार (सहायक शिक्षक, राजोपाध्येनगर, विद्यामंदिर ).खासगी शाळा : वसुधा कृष्णात चव्हाण (सहायक शिक्षिका, गागी देसाई टोपीवाले विद्याभवन, भवानी मंडप), सूर्यकांत मुरलीधर माने (सहा. शिक्षक, त्र्यंबोली विद्यामंदिर, टेंबलाईवाडी), शरिफा राजेसाब पेंढारी (सहायक शिक्षिका, सावित्री श्रीधर विद्यामंदिर, सदर बझार), परशराम शंकर घाटगे (सहा. शिक्षक, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, रुईकर कॉलनी), इंदुबाई वसंत माळी (सहाय्यक शिक्षिका, वाय. पी. पोवार विद्यामंदिर, मुक्त सैनिक वसाहत) यांच्यासह तानाजी पाटील (सहायक शिक्षक, संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर), प्रियांका साजणे (सहायक शिक्षिका, शेलाजी वनाजी विद्यालय, लक्ष्मीपुरी), अशोक कांबळे (सहायक शिक्षक, माझी शाळा, भोसलेवाडी) यांना विशेष पुरस्कारकर्मचारी : राजश्री सूर्यवंशी (सेविका, राजर्षी छत्रपती संभाजी विद्यालय, मोरे कॉलनी), नागेश आचार्य (सेवक, शिक्षण मंडळ, कोल्हापूर) यांचा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)घोळ पुरस्कारांचा अन् हॉलचाहीप्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने जाहीर होणाऱ्या पुरस्कारांचा घोळ शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये कधी सभापती, तर कधी उपसभापती हे वारंवार जाऊन त्यात बदल करीत होते. त्यामुळे ही यादी सायंकाळपर्यंत तयार होत नव्हती. याचबरोबर महापालिकेच्या या शिक्षण विभागाला हा पुरस्कार सोहळा वितरण करण्यासाठी हॉल मिळत नव्हता. अखेर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा हॉल या सोहळ्यासाठी निवडण्यात आला. विद्यार्थ्यांना मोफत पासमहापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी, म्हणून सभापती महेश जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती व ३५० विद्यार्थ्यांना के.एम.टी. बस सेवेचे पास मोफत देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे महापालिकेच्या ५९ शाळांमधून ७२ विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती व ३५० विद्यार्थ्यांना मोफत बस पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.