शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’

By admin | Updated: November 5, 2014 00:48 IST

महापालिकेचा खुलासा : ठेकेदारास अद्याप अ‍ॅडव्हान्स दिलेलाच नाही

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीला केंद्र सरकारच्या अटीप्रमाणे ४८८ कोटींच्या कामासाठी १० टक्क्यांप्रमाणे ४८ कोटी अ‍ॅडव्हान्स (आगाऊ रक्कम) देता येतात. ठेकेदारास महापालिकेने अ‍ॅडव्हान्स दिलेला नाही. ठेकेदाराकडून अ‍ॅडव्हान्सच्या ११० टक्के जादा म्हणजेच ५४ कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी घेतली जाणार आहे. संपूर्ण ५२ किलोमीटरची पाईप सरकारी जागेतून जाते. सर्व प्रकारच्या सर्वेक्षणासह पाटबंधारे विभागाकडून १.३५ हेक्टर जमिनीचा ताबाही मिळाला आहे. येत्या डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. केंद्राच्या नियमाप्रमाणेच निविदा व कामाची प्रक्रिया व पैसे अदा केले जाणार असल्याने पाईपलाईनबाबत ‘नो टेन्शन’ असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.पाटबंधारेमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, योजना राबविताना पारदर्शकता नाही. ठेकेदारास १०० कोटी रुपयांचा अ‍ॅडव्हान्स दिलेला आहे; त्यामुळे केंद्राकडे योजनेबाबत तक्रार करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने ‘लोकमत’कडे योजनेबाबत संपूर्ण खुलासा केला.ठेकेदारास अ‍ॅडव्हान्स दिल्यानंतर एक वर्षात त्या रकमेचे काम न झाल्यास बॅँक गॅरंटीच्या रकमेतून अ‍ॅडव्हान्स रक्कम वजा करण्याची तरतूद आहे. कामाच्या प्रत्येक टप्प्यावर ठेकेदारास केंद्राच्या नियमानुसारच पैसे दिले जाणार आहेत. संपूर्ण ५२ किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ५२ किलोमीटरसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पायरल वेल्डेड पाईपपैकी ४० टक्के पाईपची आॅर्डर ठेकेदाराने दिली आहे. ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर पुढील पाईप मागविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील १७ किलोमीटर पाईपलाईनच्या जागेसाठी पीडब्ल्यूडी व जिल्हा परिषदेकडे परवानगी मागतली आहे.या मार्गातील झाडांची किंमत ठरविण्यासाठी वन विभागाकडे फीसाठीचे पैसे भरले आहेत. धरणाजवळ १५ लाख लिटर पाण्याची टाकी व कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी आवश्यक १.३५ हेक्टरची जागा पाटबंधारे विभागाने मंजूर केली आहे. पुईखडी ते चंबुखडी, पुईखडी ते शेंडा पार्क, पुईखडी ते फुलेवाडी या मार्गातील १८ किलोमीटर पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याची टाकी व जलशुद्धिकरण केंद्राचे हायड्रॉलिक व आरसीसी आराखडा तयार आहे. पुढील आठवड्यात तो शासकीय तंत्रनिकेतनकडून मंजूर करून घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)पाईपलाईन योजनेची तयारी५४ कोटींच्या बॅँक गॅरंटीनंतर ४८ कोटी अ‍ॅडव्हान्स देण्याची तरतूदएक वर्षात काम न झाल्यास गॅरंटीतून रक्कम वजा करणार५२ किलोमीटरचा सर्व्हे पूर्ण; संपूर्ण पाईप सरकारी जागेतूनधरणाजवळ पाण्याच्या टाकीसाठीची १.३५ हेक्टर जागा पाटबंधारे विभागाने दिली.निविदेप्रमाणेच काम व त्याप्रमाणेच पैसे अदा केले जाणार१७ किलोमीटरच्या मार्गातील झाडांचे सर्वेक्षण पूर्ण; वनविभागाकडून नुकसानीचा अभिप्राय मागविणार.पाण्याच्या टाक्यांना जोडणाऱ्या १८ किलोमीटर पाईपचा सर्व्हे पूर्णठेकेदारास एक रुपयाही अ‍ॅडव्हान्स दिलेला नाही.डिसेंबरच्या मध्यापर्यंत प्रत्यक्ष कामास सुरुवात.