कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे एकूण ५ लाख ७१ हजार ५८५ विद्यार्थी परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेशित झाले. या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या घटक चाचणी, सहामाही आणि तोंडी परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करून गुणपत्रिका, प्रगतिपुस्तक देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुढे शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही इयत्तांमधील कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १ लाख ८ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यांच्या मूल्यमापनाची कार्यवाही शाळा, महाविद्यालयांमध्ये सुरू आहे.
पॉईंटर्स
जिल्ह्यातील शाळा
जिल्हा परिषद शाळा : ३०२७
खासगी अनुदानित शाळा : ९५०
खासगी विनाअनुदानित शाळा : १४०
एकूण विद्यार्थी : ६,८०,६४८
कुठल्या वर्गात किती विद्यार्थी?
पहिली-५५३०१
दुसरी-५७४५२
तिसरी-५७६०९
चौथी-५७८३४
पाचवी-५७८४१
सहावी-५७३९५
सातवी-५८३२०
आठवी-५८८००
नववी-६०२२६
दहावी-५६७४५
अकरावी-५१३५९
बारावी-५१७६६
चौकट
ऑनलाईन शिक्षणाचे फायदे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्राला ऑनलाईनचा नवा पर्याय सापडला. त्यामुळे पूर्णपणे शिक्षण खंडित झाले नाही. ते सुरू राहिले. विज्ञान, इतिहास, भूगोल, आदी काही विषयांमधील संकल्पना अधिक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून घेणे शक्य झाले. शिक्षकांनी ऑनलाईन केलेले मार्गदर्शन रेकॉर्डिंग करून, व्हिडीओ जतन करून त्याद्वारे पुन्हा एखादा विषय, मुद्दा विद्यार्थ्यांना समजावून घेता येत आहे.
चौकट
ऑनलाईन शिक्षणाचे तोटे
या ऑनलाईन शिक्षणामुळे अधिकत्तर प्रमाणात शिक्षकांचा एकतर्फी संवाद झाला. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये एकाकीपणा, स्वमग्नता वाढली. त्यांच्यात डोळे, मानेचे विकार निर्माण झाले. स्मार्टफोन, नेटवर्क, आदी साधने असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतच हे शिक्षण पोहोचले.
चौकट
शहरे आणि खेडेगाव
या ऑनलाईन शिक्षणाचे एकूण चित्र पाहता इंटरनेट, नेटवर्क आणि स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब अशी साधने असलेल्या शहरातील विद्यार्थ्यांपर्यंत हे शिक्षण पोहोचले. मात्र, स्मार्टफोनपासून नेटवर्क उपलब्धतेची समस्या असलेल्या जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले असल्याचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी मंगळवारी सांगितले.
===Photopath===
220621\22kol_2_22062021_5.jpg
===Caption===
डमी (२२०६२०२१-कोल-स्टार ८३५ डमी)