गारगोटी : कोरोनाच्या बाबतीत बेफिकीर राहून आपले आणि आपल्या घरातील लोक, समाज यांचे आरोग्य धोक्यात आणू नका. कोरोनाची तपासणी करून वेळीच औषधोपचार करून कोरोनापासून स्वत:चा बचाव करा, असे कळकळीचे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
ते गारगोटी ग्रामीण रुग्णलायातील रुग्णवाहिकेच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. सभापती सुनील निंबाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प. स. सदस्य अजित देसाई, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम, संदीप साळोखे, जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सचिव शिवाजीराव ढेंगे, ग्रा. प. सदस्य रणधीर शिंदे आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
गारगोटी : ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर, सभापती सुनील निंबाळकर, डॉ. भगवान डवरी, डॉ. मिलिंद कदम आदी.