कोल्हापूर : जिकडे महाडिक, तिकडे आपण जाणार नाही, असे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत अजून आपल्या गटाची भूमिका जाहीर झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दुपारी बाराच्या सुमारास सतेज पाटील हे या ठिकाणी आले होते. काहीवेळ थांबून त्यांनी मंडलिक यांना शुभेच्छा देत चौकशी केली. यानंतर चहा घेऊन ते अवघ्या दहा मिनिटांतच निघून गेले.गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी मंडलिक यांची घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवडणुकीबाबत काही चर्चा होते का याबाबत उत्सुकता होती परंतु दहा मिनिटांच्या भेटीमध्ये संक्रांतीच्या शुभेच्छा व तब्येतीची खुशाली यावर चर्चा होऊन अन्य कुठल्या विषयावर चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंडलिक यांची भेट घेऊन विचारणा केली असता ते म्हणाले, सतेज पाटील यांनी आपली भेट घेतली परंतु यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत जिकडे महाडिक असतील तिकडे आपण जाण्याचा प्रश्नच नाही. कारण महाडिकांचे राजकारण हे पैशांचे आहे. त्याचा राजकारण आणि सहकारात होत असलेला वापर हे वाईट आहे. त्याला आपला विरोध राहील. दरम्यान, दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. (प्रतिनिधी)‘गोकुळ’मध्ये सतेज-मंडलिक एकत्र ?मकर संक्रांतीनिमित्त माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोघांत काही चर्चा झाल्याचे समजते. आगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
जिकडे महाडिक, तिकडे आपण नाही
By admin | Updated: January 16, 2015 00:25 IST