शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे निवडणूक लढवणार नाही

By admin | Updated: April 15, 2017 01:10 IST

चंद्रकांतदादा पाटील : नेसरीत महासंपर्क अभियान कार्यक्रम उत्साहात

नेसरी : पक्षाकडून मी कधी आमदारकी मागितली नाही, कधी मंत्रिपद मागितले नाही. राज्यात नंबर २ चा नेता म्हणून पक्षाने विश्वास टाकला. मी तर सगळ्यात सुखी माणूस असेन, जेव्हा मोदीजी सांगतील की, बास, आपकी बहुत सेवा हुई, अब आपके घर मे आराम करो, तर मी ईश्वराची साधना आनंदात करण्यात वेळ घालवेन, असे प्रतिपादन करत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करा, असा सवाल देत मी येथून पुढे कुठलीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केली. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे पं. दिनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी सोहळा, भाजप कार्यकर्ता मेळावा व नूतन जि. प. व पं. स. सदस्यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे विभागीय संघटक रवी अनासपुरे होते. डॉ. प्रकाश शहापूरकर, मारुती राक्षे, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.येत्या वर्षभरात जिल्ह्यातील रखडलेले नऊ पाणी प्रकल्प मार्गी लावणार असून उचंगी, आंबेओहळ प्रकल्पात पुढच्या वर्षी पाणीसाठा होईल व जमीन संपादित केलेल्या शेतकऱ्यांना मे महिन्यात धनादेश देण्यात येणार असल्याची माहितीही दिली. आधीच्या सरकारने १५ वर्षांत २४ प्रकारच्या योजनांवर खर्च केला नाही, असा टोलाही यावेळी विरोधकांवर मारला.रवी अनासपुरे यांनी विविध योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ कार्यकर्त्यांनी मिळवून द्यावा. बाबा देसाई म्हणाले, सगळीकडे आता कमळ फुलले आहे. भाजपचा विचार सर्वांना पटल्यामुळे आता विजय दूर नाही. तेव्हा २०१९ ला जिल्ह्यातील १० पैकी १० आमदार हे भाजपचेच असतील.जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी स्वागत केले. यावेळी पं. स. सभापती जयश्री तेली, जगन्नाथ हुलजी, नूतन जि. प. सदस्य राणी खमलेट्टी, सुनीता रेडेकर, अनिता चौगुले, कल्लाप्पा भोगण, पं. स. सदस्य विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते बुके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी राजेंद्र तारळे, महादेव साखरे, एन. डी. पाटील, नामदेव पाटील, दयानंद चौगुले, बाबूराव पाटील, प्राचार्य डॉ. के. आर. पाटील, संग्रामसिंह शिंदे-नेसरीकर, प्राचार्य आर. बी. पाटील,यांच्यासह आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामान्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना आहेत. त्या फक्त कागदावर राहता कामा नयेत, तर त्याचा उपयोग गरजू व सर्वसामान्यांपर्यंत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पोहोचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.