लोकमत न्यूज नेटवर्क
रूकडी माणगाव : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत निराधार नागरिकांचे सेवा करणेचे भाग्य लाभत आहे. लोकांची सेवा करताना वेगळाच अनुभव येत असतो. त्यामुळे तालुक्यातील एक लाभार्थी वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले. माणगाव येथे संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत लाभार्थी यांना मंजूर पत्राच्या वाटपप्रसंगी बोलत होते.
आमदार राजू आवळे म्हणाले, निराधार अनुदान समितीने चालूवर्षी तालुक्यामध्ये १४९७ लाभार्थी अनुदान मंजूर केले असून, माणगाव, साजणी, रुकडी, रुई, तीळवणी या पाच गावांतील एकूण १७१ लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर केली आहे. निराधार समितीचे सदस्य झाकीर भालदार यांच्या सहकार्यामुळे या परिसरातील लाभार्थींना जलद लाभ मिळाला असून, सामान्यांविषयी त्यांची असलेली कणव दखल घेण्यासारखी आहे. याप्रसंगी डॉ. मनीषा महाजन यांनी विचार व्यक्त केले. निराधार समितीचे सदस्य झाकिरहुसेन भालदार यांनी पत्रवाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास समितीचे सदस्य सचिन चव्हाण, मंडल अधिकारी अरुण पुजारी, कॉ. सदा रुमलाबादे, रुकडीचे सरपंच रफिक कलावंत, दिलीप इंगळे, सिकंदर पेंढारी, बंडू पोळ, साजणीचे आप्पा पाटील, दिनकर कांबळे, डॉ. मनीषा महाजन, ग्रा. पं. सदस्य, नितीन कांबळे, संघमित्रा माणगावकर, संध्याराणी जाधव, अनिता बिरनाळे, गीता कोळी, वासवी बोरगावे, अनुसया जोग, शहनाझ मोकाशी, शिवसेना शहरप्रमुख रमेश घोरपडे, शाखाप्रमुख तानाजी जोग यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो- मंजूूर पत्र वाटप करताना आमदार राजू आवळे, झाकीरहुसेेन भालदार, मनीषा महाजन, वासवी बोरगावे, अनिता बिरनाळे, गीता कोळी, अनुसया जोग.