शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बदल्यांच्या टक्केवारीत अडकले नितीन माने

By admin | Updated: May 28, 2014 00:56 IST

जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्यांचा गौप्यस्फोट : दहा दिवसांत चौकशीअंती कारवाईचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे आश्वासन

कोल्हापूर : ग्रामपंचायतींची कामे अन् ग्रामसेवकांच्या बदल्यांच्या टक्केवारीत हात ओले केल्याशिवाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) नितीन माने कामच करत नाहीत. त्यातून त्यांनी सदस्यांनाही सोडले नसल्याचा गौप्यस्फोट जिल्हा परिषद सदस्य शशिकांत खोत यांच्यासह अन्य सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केला. खोत यांनी या विषयाला तोंड फोडल्यानंतर अन्य सदस्यांनी हा विषय लावून धरत माने यांच्या विभागीय चौकशीची मागणी करत सभागृह रोखून धरले. सदस्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे माने यांची भंबेरी उडाली. अखेर येत्या दहा दिवसांत संबंधित आरोपांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने वातावरण थंड झाले. कागलकर हाऊस येथील नवीन कार्यालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नितीन माने यांच्या कारभाराला बाजीराव पाटील यांनी तोंड फोडले. महिन्यापूर्वी दिलेल्या तक्रारीचे काय झाले,अशी विचारणा करत दहा दिवसांत माहिती मिळणे गरजेचे असताना जाणीवपूर्वक तुम्ही विलंब केल्याचा आरोप करत नितीन माने यांना उभे करा, मीच प्रश्न विचारतो, असे खोत यांनी विजय सूर्यवंशी यांना सुनावले. ‘जन सुविधा’ योजनेतून सदस्यांकडून किती टक्केवारी घेतली, हुकूमशाहीप्रमाणे अँटी चेंबरमध्ये जाऊन ग्रामसेवकांचे खिसे मोकळे करणारे माने कोण, ३८ हजारांची शवदाहिनी ५४ हजाराला खरेदी केली, स्वत:ची गाडी जिल्हा परिषदेकडे भाड्याने लावून स्वत:च वापरण्याचा ‘प्रताप’ माने यांनी केल्याचा आरोप करत सदस्यांकडून पैसे घेतलेल्या नोटांचे नंबर आपल्याकडे आहेत, ग्रामसेवकांना पुराव्यासाठी सभागृहात आणू का? माने यांचा ‘कलेक्टर’ अजिंक्य गायकवाडला बोलवा, अशी मागणी खोत यांनी मागणी केल्याने सभागृहातील वातावरण धीरगंभीर बनले. सर्वच विभागांत पाणी मुरते, चिंचवडे येथील कामासाठी माने यांनी ६० हजार रुपये घेतल्याचा आरोप करत अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कामेच करत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विलास पाटील (कोपार्डे) यांनी केली. त्यामध्ये हस्तक्षेप करत खोत म्हणाले, निर्मल ग्राम अंतर्गत शौचालय अनुदानाचे धनादेश टक्केवारीसाठी जाणीवपूर्वक माने यांनी रोखून धरले होते. त्यांच्या अनेक कारस्थानाचे आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे, अशा भ्रष्ट अधिकार्‍याला ‘हक्काच्या रजे’वर पाठवण्याची मागणी करत असताना खोत एकेरीवर आले. त्यांना रोखत, सभागृहाच्या परंपरेला गालबोट लागेल, असे शब्द वापरू नका, आरोपांची शहानिशा करावी, अशी सूचना धैर्यशील माने यांनी केली. चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. पन्हाळा तालुक्यातील तीस वर्षांवरील महिलांचे हिमोग्लोबिन तपासणीचा उपक्रम सुरू आहे. ६ हजार महिलांची तपासणी पूर्ण झाली असून त्यामध्ये १४ टक्के महिलांना मधुमेह झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामासाठी मदतीची गरज आहे, जिल्हा परिषदेने मदत द्यावी, अशी मागणी भाग्यश्री पाटील यांनी केली. कबनूर येथील जलकुंभासाठी प्राथमिक शाळेची जागा द्यावी, अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली. यावर हरकत घेत ही केंद्रशाळा आहे, जलकुंभाबरोबर बौद्ध समाजाने ही जागा मागितल्याचे विजया पाटील यांनी सांगितले. यामध्ये हस्तक्षेप करत स्वत: भेट देऊन त्यानंतर निर्णय घेऊ, असे अध्यक्ष उमेश आपटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)