शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरभेटीतून ‘निर्मल ग्राम’चे प्रबोधन

By admin | Updated: August 27, 2016 00:48 IST

सुषमा देसाई : २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करणार; लोकप्रतिनिधींचा सहभाग

कोल्हापूर : जिल्हा ८९ टक्के निर्मल ग्राम झाला असून, २ आॅक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्हा शौचालययुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी घरभेटीच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहे. यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील सर्वांत जास्त निर्मल ग्रामपंचायती म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा गौरव झाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामुळे केंद्र शासनाच्या पातळीवरही जिल्ह्याने कामाचा ठसा उमटविला. केंद्र सरकारने जून २०१५ मध्ये ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत ‘शौचालययुक्त गावा’ची संकल्पना नव्याने मांडली. सध्या जिल्ह्यात ६४९ ग्रामपंचायती निर्मल झाल्या आहेत. ३८० ग्रामपंचायती २ आॅक्टोबरपूर्वी निर्मल करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा ९७ टक्के निर्मलग्राम असतानाही जिल्ह्यातील १ लाख २९ हजार ८०८ कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे निदर्शनास आले असून, यापैकी ५८ हजार शौचालये बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी तालुकानिहाय ‘घरभेटी’चे नियोजन केले असून, सहा हजार घरभेटी पूर्ण केल्या आहेत. या भेटींत हस्तपत्रिका वाटप करून शौचालय नसणाऱ्या घरांवर ‘रेड स्टिकर्स’ लावली जाणार आहेत. या भेटीत मंत्रिमहोदयांसह लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, असे अभिप्रेत असल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘स्वच्छ भारत’ मिशनअंतर्गत २ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा शौचालययुक्त करण्याचा संकल्प असून यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्रीबारा हजारांचे अनुदान!शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला बारा हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. अनुदानामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के, तर राज्य सरकारचा ४० टक्के वाटा राहणार असून, वर्षभरात आठ कोटींचे अनुदान दिल्याचे सुषमा देसाई यांनी सांगितले.