शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

सुन्न मनाला फुटले पुन्हा हुंदके--‘महापालिके’तर्फे पाच लाखांच्या मदतीचा धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:01 IST

कोल्हापूर : गेल्या आठवड्यात केएमटी बसला झालेल्या अपघातात कोणाचा कर्ता पुरुष गेला, तर कोणाचा कोवळा मुलगा गेला.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या आठवड्यात केएमटी बसला झालेल्या अपघातात कोणाचा कर्ता पुरुष गेला, तर कोणाचा कोवळा मुलगा गेला. अठराजण गंभीर जखमी झाले. त्यातील काहीजण अद्यापही उपचार घेत आहेत. या दु:खाच्या वेदनांनी व्याकुळ झाल्यामुळे अनेकांचा आक्रोश झाला. आजही ही मनं सावरायला तयार नाहीत. सोमवारी सायंकाळी मात्र महानगरपालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी जेव्हा अपघातग्रस्तांच्या गल्लीत पोहोचले तेव्हा मात्र सुन्न मनांना पुन्हा एकदा हुंदके फुटले. या दु:खावेगाने महापौर हसिना फरास, नगरसेविका दीपा मगदूम, माधवी गवंडी, शमा मुल्ला यांनाही आपले हुंदके आवरता आले नाहीत.पापाची तिकटी ते गंगावेश रस्त्यावर झालेल्या बस अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत महापौर हसिना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी जाहीर केली होती. या मदतीचे धनादेश देण्यासाठी महापौर फरास, आयुक्त चौधरी, सभागृह नेते प्रवीण केसरकर, शिक्षण सभापती वनिता देठे, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक संदीप कवाळे, संजय मोहिते, अशोक जाधव, शेखर कुसाळे, संतोष गायकवाड, नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळे, शोभा बोंद्रे, उमा बनछोडे, शमा मुल्ला, भाग्यश्री शेटके, अतिरिक्तआयुक्त श्रीधर पाटणकर, केएमटीचे अतिरिक्त वाहतूक व्यवस्थापक संजय भोसले, आदींनी अपघातातील मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच त्यांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीचे धनादेश दिले.सुजल अवघडे या चौदा वर्षांच्या कोवळ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय आजही दु:खावेगानेव्याकुळ आहेत. त्याच्या छोट्याशा घरात महापौर फरास यांच्यासहदीपा मगदूम, माधुरी गवंडी,शमा मुल्ला पोहोचताचसुजलच्या आईने पुन्हा हंबरडा फोडला. ‘माझ्या पोराची काय चूकहोती’ अशी विचारणा करताच सर्वांनाच भडभडून आले. चौघींनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.तीन कुटुंबांतील सदस्य धक्क्याने हादरून गेले असून, ती कुटुंबे अद्याप सावरलेली नाहीत. जे जखमी आहेत त्यांच्याही घरात दु:खाच्या वेदना आहेत. एकूणच राजारामपुरी मातंग वसाहतील वातावरण भयग्रस्त आहे.