शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

व्हॅन ओढ्यात कोसळून नऊ ठार

By admin | Updated: July 4, 2016 00:56 IST

२४ जण जखमी : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथील दुर्घटना; मृतांमध्ये पाच महिला; आठजण मादळेचे

कोल्हापूर/हातकणंगले : कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथे भरधाव पिकअप व्हॅन ओढ्यावरून पंचवीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात मादळे (ता. करवीर) येथील पाच महिलांसह नऊजण ठार झाले, तर २४ जण गंभीर जखमी झाले. इचलकरंजी येथील नातेवाइकाच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. एकाच गावातील आठजण ठार झाल्याने संपूर्ण मादळे गाव शोकसागरात बुडाले. मृतांमध्ये कोंडिबा पांडुरंग पोवार (वय ५५), विलास शंकर कोपार्डे (६०), पुतळाबाई बाळू पोवार (५५), रत्नाबाई रंगराव पोवार (६०), कोंडिबा पांडू चौगुले (५५), नामदेव बापू पोवार (५८), गुलशन लालासो पटेल (७०), छाया आनंदा कोपार्डे (५५, सर्व रा. मादळे, ता. करवीर), सुवर्णा दिनकर माजगावकर (३५, रा. पुलाची शिरोली) यांचा समावेश आहे. इचलकरंजीतील बंडगर माळ येथील नातेवाइकाचे निधन झाल्याने रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी मादळे येथील ३३ महिला-पुरुष पिकअप व्हॅनमधून (एमएच ०९, सीयू ६३८८) रविवारी सकाळी गेले होते. कार्यक्रम आटोपून दुपारी सर्वजण घरी येत होते. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने रस्ताही निसरडा झाला होता. व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक भरल्याने गाडी रस्त्याने हेलकावे खात होती. अन् चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले भरधाव व्हॅन कोल्हापूर-सांगली मार्गावरील माले फाटा येथे येताच काही कळायच्या आतच चालकाचा स्टिअरिंगवरील ताबा सुटून तो ओढ्यावरील पुलाच्या कठड्याला धडकून पंचवीस फूट खाली कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला. व्हॅनखाली सापडून कोंडिबा पोवार, विलास कोपार्डे, पुतळाबाई पोवार, रत्नाबाई पोवार जागीच ठार झाले; तर काहीजण अडकून पडले तसेच अन्य बाजूला फेकले गेले. काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले. किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक व वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. पंचवीस फुटांखालून जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. अंगावर शहारे आणणारे दृश्य माले फाटा येथे मोठा अपघात झाल्याची माहिती समजताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विखुरलेले मृतदेह, निपचित पडलेले जखमींचे दृश्य पाहून अंगावर शहारे येत होते. क्रेनच्या साहाय्याने व्हॅनखाली सापडलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते हातकणंगले प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. जखमींना तातडीने शासकीय रुग्णवाहिकेसह मिळेल त्या वाहनांतून ‘सीपीआर’मध्ये पाठविले. अपघाताचे वृत्त तत्काळ मदत नाही : स्थानिक धावले ४अपघातस्थळी अपघातातील जखमींना ओढ्यातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत मिळाली नाही. चौपदरी रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात होती. ४मदतीसाठी जखमी आणि रस्त्यावरील मोटारसायकल चालक आरडाओरडा करीत होते. अखेर स्थानिक नागरिक, मोटारसायकल चालक आणि पोलिस यांनी येणारी खासगी वाहने, रुग्णवाहिका यांचा वापर करून जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. ४ओढ्यातून गाडी बाहेर काढताना क्रेनला वारंवार अडथळा निर्माण होत होता. मृतदेह बाहेर काढून ते रुग्णवाहिकेतून हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी समपॅन सेवा संस्थेचे स्वप्निल नरुटे यांनी मोठे योगदान दिले. \जखमींची नावे : चालक नारायण हिंदुराव चौगुले (वय ४५), हौसाबाई निवृत्ती चौगुले (५५), सखू विलास बिडकर (६५), अशोक बिडकर (३५), वैशाली अशोक बिडकर (२२), रंगराव शंकर बोरपाडळे (७०), सजाखान नायकू चौगुले (३०), कल्पना मारुती रकटे (४३), महादेव नाना चौगुले (६०), नायकू श्रीपती शिंदे (५८), वसंत जोती चौगुले (६०), कमल चंद्रकांत पवार (३०), बाबासो महादेव पवार (४५), वसंत मारुती चौगुले (५०), शालाबाई रघू चौगुले (६५), बाजीराव गणपती शिंदे (६५), हिराबाई नारायण पोवार (५०), सखूबाई बाबू कोपार्डे (६०), शालाबाई जाधव (६०), भीमराव पांडुरंग पोवार (५०), सुवर्णा मारुती भोसले (२८), रजनीकांत अण्णाप्पा वडर (३९, सर्व रा. मादळे, ता. करवीर), शंकर रंगराव पाटील (५५), पार्वती शंकर चौगुले (५०, दोघे, रा. कोरेगाव, ता. वाळवा, जि. सांगली). समजताच सादळे-मादळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात मादळे गावावर शोककळा माले फाटा येथे झालेल्या अपघातात मादळे (ता. करवीर) येथील आठजण ठार झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. संपूर्ण गावात स्मशानशांतता पसरली. निसर्गाच्या कुशीतील मादळे गाव शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. येथील लोकांचा शहराशी जास्त संपर्क नाही. आहे त्यामध्ये समाधान मानणारे येथील लोक मोलमजुरी करून जगतात. महिन्यापूर्वी घेतली होती पीकअप व्हॅन नारायण चौगुले यांनी महिन्यापूर्वी नवीन व्हॅन घेतली होती. त्या जोशात भरधाव वेगात व्हॅन चालवीत असताना काळाने झडप घातली. व्हॅनचे मोठ्या प्रमाणात मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत अपघाताचे वृत्त समजताच जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी ‘सीपीआर’मध्ये येऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी मृतांच्या नातेवाइकांना सावरत पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा व जनधन योजनेअंतर्गत दोन लाख व मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तातडीने पाठवू; तसेच जखमींनाही मदत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी नातेवाइकांना दिली. नुकसान झाले आहे. झाली आहे. (प्रतिनिधी)