शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

फौंड्री क्लस्टरचे नऊ कोटी जमा

By admin | Updated: January 6, 2015 21:18 IST

तिसरा हप्ता : उद्योगाला मिळणार चालना; डिसेंबरअखेर होणार कामे पूर्ण

सतीश पाटील - शिरोली -फौंड्री क्लस्टरला नऊ कोटी रुपयांचा तिसरा हप्ता नुकताच जमा झाला आहे. केंद्र शासनाकडून क्लस्टरसाठी आतापर्यंत सुमारे २७ कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत सुरू असलेले क्लस्टरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.उद्योगांना प्राथमिक सुविधा, अत्याधुनिक मशिनरी, प्रयोगशाळा, सांस्कृतिक सभागृह उपलब्ध व्हावे यासाठी सर्व उद्योजकांनी एकत्र येऊन केंद्र शासनाच्या ४२ कोटी रुपयांचा फौंड्री क्लस्टर आराखडा तयार केला होता. तो मंजूर होऊन ७५ टक्के रक्कम केंद्र शासन, १० टक्के महाराष्ट्र शासन आणि १५ टक्के स्थानिक उद्योजकांचे, असे एकूण ४२ कोटी रुपयांचे हे क्लस्टर मंजूर झाले आहे.या क्लस्टरसाठी तीन टप्प्यांत केंद्र शासनाचा २७ कोटी निधी आला आहे, तर राज्य शासनाचा दोन टप्प्यांतील निधी आला असून, उद्योजकांनीही १५ टक्के गुंतवणूक केली आहे. यासाठी चीनहून सँड प्लँटची मशिनरी आली आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतीत सँड प्लँटसाठी शेड मारण्याचे काम सुरू असून, मार्चपर्यंत हे शेड पूर्ण होईल. आॅक्टोबर २०१५ पर्यंत प्लँट सुरू होईल. तसेच कॉमन फॅसिलिटी सेंटरची इमारत बांधून तयार आहे. याशिवाय कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये अत्याधुनिक सभागृह, रामभाई सामाणी हॉल, कॅडकॅमचे काम पूर्णत्वास आले आहे. कॅडकॅममुळे कोल्हापुरातील लघुउद्योगांना अनुभवी मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी अंदाजे एक कोटी ४० लाखांचा खर्च येईल. जयसिंगपूर येथील एल. के. अकिवाटे आणि शिरोळमधील अशोकराव माने औद्योगिक वसाहतीला रस्ते, ड्रेनेज, स्ट्रिटलाईट, पाणी यासाठी सुमारे सात कोटी रुपये क्लस्टरमधून मंजूर आहेत. ही कामेही अंतिम टप्प्यात आहेत. क्लस्टरमुळे जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींचा चेहरा बदलणार आहे. उद्योगांना आणि उद्योजकांना याचा मोठा फायदा होणार आहे. डिसेंबर सन २०१५ पर्यंत सर्व क्लस्टर पूर्ण होईल, असे उद्योजकांना सांगितले.कोठे किती कामे४२ कोटींच्या क्लस्टरमधून शिरोली औद्योगिक वसाहतीत १४ कोटी ८८ लाख रुपयांचे आणि गोकुळ शिरगाव औद्योेगिक वसाहतीत १८ कोटींचे सँडरिक्लेमेशन प्लँट उभारले जात आहेत. जयसिंगपुरातील एल. के. अकिवाटे आणि शिरोळमधील अशोकराव माने औद्योगिक वसाहतीत सात कोटींची कामे मंजूर आहेत. ही कामे सुरू असून, अंतिम टप्प्यात आहेत. कामे झाल्यानंतर वसाहतींना नवे रूप मिळेल.क्लस्टरमधील शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या सँड प्लँटमुळे फौंड्रीतील वेस्ट सँडचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. वेस्ट सँड पुन्हा वापरात येईल. उद्योजकांनाही त्याचा फायदा होणार आहे. - अतुल पाटील, संचालक स्मॅकफौंड्री क्लस्टरमुळे इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले. याठिकाणी रस्ते, पाणी, ड्रेनेज यांचा अभाव होता. क्लस्टरच्या माध्यमातून ते पूर्ण झाले आहेत. त्याचा येथील उद्योजकांना फायदा झाला आहे.- आर. पी. जोशी, व्यवस्थापक, एल. के. अकिवाटेइंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये होत असलेल्या कॅडकॅम सेंटरमुळे उद्योजकांना कुशल मनुष्यबळ मिळणार आहे. महिन्याला २४०० कर्मचारी हा कोर्स पूर्ण करू शकणार आहेत.- रवींद्र तेंडुलकर, अध्यक्ष कोल्हापूर इंजि.