शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नऊ नगरसेवकांवर जातवैधतेची टांगती तलवार

By admin | Updated: May 18, 2017 01:21 IST

इचलकरंजी नगरपालिका : अंतीम मुदत २८ मे; नगरसेवकांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीत आरक्षित जागावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष अलका स्वामी व आठ नगरसेवकांचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे प्रलंबित आहे. त्यातील तीन नगरसेवकांची २२ मे रोजी सुनावणी होणार आहे. आरक्षित जागांवर निवडून आलेल्या २३ नगरसेवकांपैकी १४ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत २८ मे असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सादरीकरण प्रलंबित असणाऱ्यांची कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी चांगलीच धावपळ उडाली आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत इचलकरंजी नगरपालिकेत ६२ जागांपैकी आरक्षित असलेल्या जागांवर २३ नगरसेवक व एक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. या सर्वांना जातपडताळणी विभागाकडून जातवैधता प्रमाणपत्र घेऊन २८ मेच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करायचे आहे. त्यातील आजपर्यंत कॉँग्रेस - संजय केंगार, ध्रुवती दळवाई, अब्राहम आवळे, दीपक सुर्वे, सायली लायकर. भाजप - सारिका धुत्रे, संध्या बनसोडे, तानाजी पोवार. राष्ट्रवादी - शोभा कांबळे, लतीफ गैबान, तानाजी हराळे. शाहू विकास आघाडी - शुभांगी माळी, अनिता कांबळे, विठ्ठल चोपडे व मंगेश कांबुरे या चौदा सदस्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. तर उर्वरित कॉँग्रेस - लक्ष्मी पोवार. भाजप - सोनाली अनुसे, नेहा हुक्किरे आणि ताराराणी आघाडी - सरिता आवळे, रवींद्र लोहार, इकबाल कलावंत, पल्लवी साखरे व वर्षा जोग असे पाचही सदस्यांचे मिळून एकूण नऊ सदस्यांनी अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत. त्यातील सरीता आवळे, इकबाल कलावंत व रवींद्र लोहार या तिघांच्या जातीच्या दाखल्यांबाबत तक्रारी झाल्याने त्यांची सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.दाखल्यांचे पक्षीय स्पष्टीकरणएकूण आरक्षित असलेल्या २३ जागांपैकी निवडून आलेल्या कॉँग्रेसच्या ६ सदस्यांपैकी ५ जणांनी दाखले दिले. १ प्रलंबित, भाजप ५ पैकी ३ सदस्यांनी दिले. २ प्रलंबित, ताराराणी आघाडीच्या ५ पैकी ५ ही प्रलंबित, तर शाहू आघाडीच्या ४ व राष्ट्रवादीच्या ३ सदस्यांनी दाखले दिले आहेत.नगराध्यक्षांचा दाखला प्रलंबितनगराध्यक्ष अलका स्वामी यांनी बेडा जंगम या जातीच्या दाखल्यावर निवडणूक लढविली आहे. त्यांनीही अद्याप जातवैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. तसेच त्यांचा हा जातीचा दाखला बोगस असल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार दशरथ माने यांनी केली होती. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.