भाजीपाला विकणारे, किराणा दुकानदार, बेकरी व्यावसायिक, मेडिकल व्यावसायिक, डॉक्टर, दूध व्यावसायिक अशा दोनशेंच्यावर जणांची अँटिजेन चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे व्यावसायिक थेट नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने समूह संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांची कोरोना चाचणी घेणे गरजेचे होते. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी गडमुडशिंगीतील ६, उचगाव २, व न्यू वाडदेतील एकाचा समावेश आहे. नऊ व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले असून अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडा, अन्यथा विनाकारण संचार करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो: २४ गडमुडशिंगी चाचणी
ओळ- गडमुडशिंगी येथे व्यावसायिकांची अँटिजेन चाचणी घेण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ सोहनी, रावसाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.एन. गाढवे उपस्थित होते.