शित्तूर तर्फ मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील युवा स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित १६०० मीटर धावणे स्पर्धेत वारूळ (ता. शाहूवाडी) येथील शौर्य अकॅडमीचा खेळाडू नीलेश आरसेकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. तो रोख ११ हजार १११ रुपये बक्षिसाचा व चषकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत १०१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन ग्रा. पं. सदस्या कमल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेतील अन्य विजेते पुढीलप्रमाणे - हृषिकेश ऱ्हायकर (राधानगरी), तृतीय - स्वप्निल बोंटागळे (वारुळ) , चतुर्थ - गणेश पाटील (वारूळ) , पाचवा - शहाजी किरूळकर (राधानगरी) , सहावा - सतीश पाटील (शिराळे तर्फ मलकापूर) , सातवा - आकाश मुडेकर (वारुळ) , आठवा - सचिन पाटील (शित्तूर तर्फ मलकापूर) , नववा - अच्युत भोसले (कोडोली) , दहावा - प्रतीक हिरवे (वारणानगर) .
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य बाबासोा पाटील, आबाजी पाटील, संजय पाटील, भीमराव तळप, तुकाराम पाटील, पांडुरंग कापूसकर, दत्तात्रय गुरव, बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.