शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा निखिल भारतीय फुटबॉल संघात

By admin | Updated: March 25, 2015 00:48 IST

अंडर-२३ : एएफसी पात्रता स्पर्धेसाठी ढाक्यात खेळणार

कोल्हापूर : कोल्हापूरचा सुपुत्र व सध्या पुणे एफसी फुटबॉल संघाकडून खेळणाऱ्या निखिल कदमची २३ वर्षांखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. गोवा येथे सुरू असलेल्या सराव शिबिरातून त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. अशी निवड होणारा निखिल हा कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू आहे. ढाका येथे २३ वर्षांखालील एएफसी चॅम्पियनशीप पात्रता स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी निखिल ढाक्यात खेळणार आहे. निखिलचे सातवीपर्यंतचे शालेय शिक्षण प्रायव्हेट हायस्कूल येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षण व फुटबॉलचे धडे गिरविण्यासाठी वडिलांनी त्याला पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. पुणे येथे फुटबॉलचे धडे घेताना त्याची निवड नामांकित पुणे एफसी संघाच्या १९ वर्षांखालील संघात २०११ ला झाली. त्याने १९ वर्षांखालील संघातून पुणे एफसी संघाचे दोन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्याची २०१३ मध्ये आयलीग स्पर्धेसाठी पुणे एफसीच्या वरिष्ठ संघात निवड करण्यात आली. पुणे एफसी संघाकडून खेळताना त्याने २८ नामांकित संघांविरुद्ध खेळ केला आहे. त्याने यंदाच्या हंगामात महत्त्वपूर्ण दोन गोल केले आहेत. त्याच्या कामगिरीची दखल घेत भारतीय फुटबॉल फेडरेशनने त्याची ३२ जणांच्या २३ वर्षांखालील भारतीय संघात त्याची निवड केली होती. या संघाचे निवड शिबिर गोवा व गुवाहाटी येथे सुरू होते. यातून त्याची २३ जणांच्या अंतिम संघात निवड करण्यात आली. या संघात निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहे. त्याला मालोजीराजे छत्रपती, विकास पाटील, किशोर पाटील, किरण साळोखे, राजू कदम यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)घरातूनच फुटबॉलचे बाळकडूनिखिलचे आजोबा कै. राम कदम हे प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे गोलकिपर होते, तर चुलत आजोबा शंकरराव, मुरलीधर आणि पांडुरंग कदम हेसुद्धा प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचे माजी खेळाडू होते. निखिलचे वडील एस. टी. महामंडळाचे खेळाडू, तर चुलते शिवाजी तरुण मंडळ, कोल्हापूर, सांगली पोलीस संघाचे फुटबॉल खेळाडू होते. त्यामुळे फुटबॉलचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले आहे.ढाका येथे होणार स्पर्धाएएफसी चॅम्पियनशीप २0१६ या स्पर्धेसाठी ढाका येथे पात्रता स्पर्धा होणार आहे. यात निखिल भारताकडून खेळेल. भारताचा पहिला सामना शुक्रवारी (दि. २७) उझबेकिस्तानबरोबर होणार आहे. त्यानंतर २९ मार्चला सिरिया या देशाविरुद्ध, तर ३१ मार्चला बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे.५निखिलच्या आईचे दीड वर्षापूर्वीच निधन झाले. या दु:खातून सावरत त्याने या पात्रता फेरीत घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाले. गेल्या आठ वर्षांपासून तो पुणे येथे फुटबॉलचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या निवडीने कोल्हापूरचे नाव भारतीय फुटबॉल जगतात उज्ज्वल झाले आहे. - सुरेश कदम, निखिलचे वडील