शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीचा पुढचा आमदार भाजपचाच

By admin | Updated: March 14, 2017 00:52 IST

चंद्रकांतदादा पाटील : राधानगरीत भाजप कार्यकर्ता आभार मेळावा

राधानगरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस प्रचंड मेहनत घेऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करीत आहेत. त्यामुळेच सर्वत्र भाजपला यश आले. राधानगरी तालुक्यात ऐनवेळी तयारी करूनही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चांगली मते मिळाली. पुढील दोन वर्षांत त्यामध्ये वाढ होण्यासाठी नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड मतदासंघातून आमदार भाजपच्या चिन्हावर विजयी झाला पाहिजे. यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. राधानगरी तालुका भाजपच्यावतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, केंद्रातील व राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी आहे. आघाडी करून शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे नियोजन सुरू आहे. सुधारित तंत्रज्ञान वापरून शेतीतील उत्पन्न वाढविण्याबरोबरच २२ प्रकारची पिके किमान हमी भावाने खरेदी करण्यात येतील. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊनच त्यांना पुन्हा कर्जच घ्यावे लागणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर तालुक्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. त्यानंतर नागरिकांची निवेदने स्वीकारून त्याबाबत कार्यवाहीचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. यावेळी माजी जि. प.चे शिक्षण व अर्थ समिती सभापती जगदीश लिंग्रस, व्ही. टी. जाधव, तानाजीराव चौगले, संभाजी आरडे, डॉ. सुभाष जाधव, शुभांगी आरडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) वेगळ्या विचारांचा पक्ष तालुक्यातील धामणी प्रकल्पासाठी १२०० कोटींची तरतूद केल्याने या कामाला लवकरच सुरुवात होईल. महिन्यातून एक दिवस पूर्णवेळ थांबून लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राधानगरी येथे कार्यालय सुरू करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. २०१९ ची विधानसभा निवडणूक सहा महिने अगोदर लोकसभेबरोबर होणार आहे.