शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: May 15, 2016 01:03 IST

जयसिंगपुरातील घटना : दोन महिन्यांपूर्वीचा विवाह

जयसिंगपूर : दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या अकिवाट (ता. शिरोळ) येथील युवतीने विषप्राशन करून जयसिंगपुरात आत्महत्या केली. भाग्यश्री स्वप्नील पल्लके (वय १९, सध्या रा. १३ वी गल्ली, जयसिंगपूर) असे या मृत युवतीचे नाव आहे. याबाबतची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. स्वप्नील व भाग्यश्री हे अकिवाट येथे शेजारी राहायला होते. दोन महिन्यांपूर्वी दोघांनी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता. २९ मार्च रोजी ते विवाह करून थेट कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. भाग्यश्रीने विवाह केल्याने तिच्या घरच्यांनी तिच्याशी काही संबंध ठेवला नाही. त्यानंतर हे दोघे जयसिंगपूर येथील गल्ली नं. १३ मध्ये असलेल्या चौगुले यांच्या इमारतीत भाड्याने राहण्यास आले. तेथे त्यांनी संसार थाटला होता. स्वप्नील हा इचलकरंजीत खासगी नोकरी करीत होता. तो घरी नसताना शुक्रवारी १३ मे रोजी भाग्यश्री हिने दुपारी तीनच्या सुमारास विष प्राशन केले. त्यांच्या शेजाऱ्यांनी व अशोक चौगुले यांनी तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोन्ही कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाले. हॉस्पिटलच्या परिसरात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.