शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

ज्येष्ठांच्या वर्णीने नवोदित नाराज

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

जिल्हा बँक निवडणूक : दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील इच्छुक प्रचारापासून दूर

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारीचा ताळेबंद करताना ज्येष्ठांचीच वर्णी जमा बाजूस झाल्याने, वजावट झालेल्या नवोदितांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेत संधीची अपेक्षा ठेवली होती. ऐनवेळी ज्येष्ठांनीच त्यावर कब्जा केल्याने युवक कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहू लागले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांचे नेते दोन पॅनेलमध्ये विभागले गेले आहेत. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये तीस टक्के उमेदवार यापूर्वी बँकेत अनेकदा काम केलेले अनुभवी आहेत. यातील बहुतांश उमेदवारांची नावे गैरव्यवहार प्रकरणातही समाविष्ट आहेत. त्यांच्या चौकशीचे काम सुरू आहे. ज्येष्ठांसह नेत्यांच्या नातलगांनाही उमेदवारी दिली आहे. त्यांची गोळाबेरीज केली, तर हा आकडा ५0 टक्क्याच्या घरात जातो. त्यामुळे नवोदितांना या पॅनेलमध्ये म्हणावी तशी संधी मिळाली नाही. तीन ते चार ठिकाणी नवोदित व दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळाली. काँग्रेसच्या १७ जणांच्या पॅनेलमध्ये तुलनेते ज्येष्ठांची संख्या कमी असली तरी, दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील अनेक उमेदवारांना गाफीलपणे अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याने त्यांना निवडणुकीत उतरता आले नाही. असे अनेक लोक नाराज आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचाही यात समावेश होतो. राष्ट्रवादी व भाजप नेत्यांवर विसंबून राहिल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. त्यामुळे शेवटच्या दोन नियोजनाच्या बैठकांना पृथ्वीराज पाटील अनुपस्थित राहिले. त्यांच्यासह काँग्रेसमधील अनेक उमेदवार, अर्ज मागे घ्यावे लागल्याने नाराज आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार असूनही उसने उमेदवार घेण्याची वेळ काँग्रेसप्रणित पॅनेलवर आली आहे. उमेदवारांचा हा ताळेबंद बिघडल्याने नाराजीचा तोटा सर्वच पक्षांना अनुभवावा लागण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारीजिल्हा बँकेसाठी ज्येष्ठांसह नेत्यांच्या नातलगांनाही उमेदवारी दिली आहे. हा आकडा ५0 टक्क्याच्या घरात जातो. त्यामुळे नवोदितांना या पॅनेलमध्ये जादा संधी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत.