शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सह्याद्रीत आढळल्या गोगलगायींच्या दाेन नव्या प्रजाती; दाजीपूर, आंबोलीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

कोल्हापूर : पश्चिम घाटात या आठवड्यात संशोधकांना गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला असून, सह्याद्रीतील जैवविविधता आणखीन समृद्ध झाली ...

कोल्हापूर : पश्चिम घाटात या आठवड्यात संशोधकांना गोगलगायीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लागला असून, सह्याद्रीतील जैवविविधता आणखीन समृद्ध झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्या’मध्ये एका, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे एका गोगलगायींची नवीन प्रजात आढळली आहे. ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन’ आणि डाॅ. अमृत भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सह्याद्रीतील गोगलगायी’ या प्रकल्पामधील हे संशोधन आहे.

या दोन्ही प्रजाती प्रदेशनिष्ठ प्रजाती असून, या संशोधनामध्ये कऱ्हाड आणि कोल्हापूर येथील संशोधकांचा सहभाग आहे. राधानगरी येथे आढळलेली गोगलगाय ही ११७ वर्षांनंतर ‘पेरोटेटिया’ या पोटजातीतील एका प्रजातींपैकी असल्याचा उलगडा झाला आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात आढळलेल्या नव्या प्रजातीचे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे नामकरण झाले आहे. या दोन्ही नवीन प्रजाती असल्याबद्दल याच आठवड्यात शिक्कामोर्तब झाले आहे.

कऱ्हाड येथील ‘सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालया’तील प्रभारी सहायक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले, ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन’चे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे आणि बेन रोव्हसन यांनी नव्या प्रजातीचा उलगडा केला आहे. या शोधाचे वृत्त बुधवारी ‘आर्किव्ह फर मोलुस्केंकुंदे’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाले.

डॉ. भोसले यांना ही प्रजात सर्वप्रथम २०१८ मध्ये सर्वेक्षणादरम्यान दिसली होती. २०१९ मध्ये ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन’चे कोल्हापूरचे सदस्य स्वप्नील पवार, अक्षय खांडेकर आणि विनोद आडके यांनी भोसलेे यांना या प्रजातीचे नमुने जमा करण्यास मदत केली. या तिन्ही संशोधकांनी या नमुन्यांतील शंखाचा आकारशास्त्रीय अभ्यास आणि रिप्रॉडक्शन सिस्टमचे निरीक्षण केल्यानंतर ही प्रजात नवीन असल्याचे स्पष्ट झाले.

‘पेरोटेटिया’चे वैशिष्ट्ये

देशात या पोटजातीमध्ये एकूण १४ प्रजाती सापडतात. दाजीपूरमध्ये आढळलेली ही प्रजात ‘पेरोटेटिया’ या पोटजातीमधील असून, त्यामधील शेवटची प्रजात ही १९०३ मध्ये शोधण्यात आली आहे. आता जवळपास ११७ वर्षांनंतर या पोटजातीमधून एक प्रजात उलगडली आहे. राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये आढळलेल्या या गोगलगायींच्या नवीन प्रजातीला ‘पेरोटेटिया राजेशगोपाली’ असे नाव दिले आहे. २ सेंटीमीटरपेक्षा लहान आकाराची ही प्रजात मांसभक्षी असून, आजूबाजूला मिळणाऱ्या इतर गोगलगायींना ती फस्त करते. तिच्या शंखाचा रंग पांढरा, शरीराचा पिवळसर आणि स्पर्शकांचा रंग केशरी आहे. ही प्रजात प्रदेशनिष्ठ आहे. व्याघ्र संशोधनामध्ये उल्लेखनीय काम करणारे डॉ. राजेश गोपाळ यांचे नाव या प्रजातीला दिले आहे.

आंबोलीतील गोगलगायीला

कोल्हापूरच्या संशोधकाचे नाव

कऱ्हाड येथील संत गाडगे महाराज महाविद्यालयातील प्रभारी सहायक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले यांच्यासह ‘ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन’चे प्रमुख आणि संशोधक तेजस ठाकरे, दीपक मुळ्ये आणि ‘एनएचएम लंडन’चे डाॅ. दिनारझार्दे रहीम यांनी सिंधुदुर्गातील आंबोली परिसरातील ‘शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळ’मधून शोधलेल्या गोगलगायींच्या नव्या प्रदेशनिष्ठ पोटजातीला कोल्हापूरच्या डॉ. वरद गिरी यांचे नाव दिले असून ‘वरदिया’ असे या पोटजातीचे नाव आहे. या नव्या प्रजातीचे ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असे नामकरण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात शोधलेली ही २१ वी नवीन प्रजाती आहे. याची माहिती गेल्याच आठवड्यात ‘युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनाॅमी’ या संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली आहे. डाॅ. भोसले यांना २०१७ मध्ये आंबोली येथे ही प्रजाती सर्वप्रथम आढळली. नंतर २०१९ आणि २०२० च्या पावसाळ्यातही आढळली होती. आंबोली धबधब्यानजीक झाडावर, पालापाचोळ्यामध्ये, दगडावर आणि हिरण्यकेशी मंदिराच्या भिंतींवर ही गोगलगाय आढळली. तिचा रंग करडा काळसर असून, ती ७ सेंटीमीटरपर्यंत वाढते.

कोट

गोगलगायींसारख्या छोट्या प्रजातींचे संशोधन करण्यासाठीचा हा योग्य काळ आहे. पश्चिम घाटामध्ये असलेल्या अनेक प्रजातींचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदलामुळे या प्रजाती नष्ट होण्याची भीती आहे. गोगलगायींसारख्या सूक्ष्म प्रजातींचा, तर फारच कमी अभ्यास झाला आहे. डॉ. अमृत भोसले हे मागील काही वर्षांपासून नव्याने शोधलेल्या गोगलगायींच्या प्रजातींवर काम करत असून, या शोधाला हातभार लावल्याचा मला आनंद आहे.

-तेजस ठाकरे, संशोधकप्रमुख, ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशन

--------------------------------------------------------

01072021-kol-radhanagri gogalgai.jpg

फोटो ओळी : राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये आढळलेली ‘पेरोटेटिया राजेशगोपाली’ ही गोगलगाईंची ही नवीन प्रजात, इन्सेटमध्ये संशोधक डॉ. अमृत भोसले.

01072021-kol-amboli gogalgai01-photo by omkar yadav.jpg01072021-kol-amboli gogalgai01-photo by omkar yadav.jpg01072021-kol-amboli gogalgai01-photo by omkar yadav.jpg

फोटो ओळी : आंबोलीत आढळलेली ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ प्रजातीतील गोगलगाईंची नवी पोटजात. (छाया सौजन्य : ओंकार यादव)

010721\01kol_3_01072021_5.jpg~010721\01kol_5_01072021_5.jpg

01072021-kol-radhanagri gogalgai.jpgफोटो ओळी : राधानगरी अभयारण्याच्या दाजीपूर वनपरिक्षेत्रामधील उगवाई देवी मंदिर परिसरातील देवराईमध्ये आढळलेली  'पेरोटेटीया राजेशगोपाली' ही गोगलगायीची ही नवीन प्रजात, इनसेटमध्ये संशोधक डॉ. अमृत भोसले.~01072021-kol-amboli gogalgai01-photo by omkar yadav.jpg