शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरचे नवे दर एप्रिलपासून लागू

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

नियमांत बदल : व्यावसायिकांना दिलासा

कोल्हापूर : मिळकतीचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) निश्चित करण्याच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार रेडीरेकनरचे नवे दर दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू केले जाणार आहेत. नियमांतील या बदलामुळे सध्याचे रेडीरेकनरचे दर ३१ मार्च २०१६ पर्यंत कायम राहणार आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, नव्याने स्थावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.दरवर्षी ३१ डिसेंबरला राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडून राज्याचा नवा रेडीरेकनरचा तक्ता जाहीर केला जातो. नव्या वर्षामध्ये रेडीरेकनरचे दर साधारणत: ९ ते १६ टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, राज्य सरकारने दरवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला; शिवाय दर न वाढविण्याचा निर्णय घेतला. बांधकाम व्यवसायात आधीच मंदी असल्याने पुन्हा रेडीरेकनरचे दर वाढवू नयेत, अशी मागणी राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांनी सरकारकडे केली होती. मात्र, दरवाढ न करण्याच्या निर्णयाची सूचना अथवा आदेश जिल्हा मुद्रांक कार्यालयाला बुधवार (दि. ३० डिसेंबर) पर्यंत मिळालेल्या नव्हत्या. त्यामुळे दर वाढणार की, ‘जैसे थे’ राहणार, याबाबत संभ्रमावस्था होती. बांधकाम व्यावसायिक आणि स्थावर मालमत्ता खरेदीच्या प्रतीक्षेतील नागरिकांना रेडीरेकनरचे दर जाहीर होण्याची गुरुवारी प्रतीक्षा लागून राहिली होती. सायंकाळी पुण्यातील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाकडून दि. १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर लागू केले ज्ाातील, असे जाहीर करण्यात आले. रेडीरेकनरचे नवे दर एक एप्रिलपासून जाहीर करावेत, ही बऱ्याच वर्षांपासूनची बांधकाम व्यावसायिकांची मागणी होती. आता ती पूर्ण झाली आहे. बांधकाम व्यावसायिकांचे आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होत असल्याने नियमांतील बदल उपयुक्त ठरणारा आहे. मात्र, एप्रिलला नवे दर जाहीर करण्याचा नियम यापुढेही कायम राहावा, इतकी अपेक्षा आहे. - महेश यादव, अध्यक्ष,क्रिडाई कोल्हापूर