शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

केबलचे नवे पॅकेज ३० टक्के जणांकडेच-: प्रतिसाद नसल्याने केबलचालकांची घालमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 01:02 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या निर्देशानुसार अटींसह नव्या दरपत्रकानुसार जानेवारी महिन्यापासून केबल प्रक्षेपणासाठी पॅकेजची नोंदणी सुरूआहे; परंतु अद्याप ३० टक्के लोकांनीच

ठळक मुद्देग्राहकांमध्ये अनास्था

कोल्हापूर : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथॉरिटी आॅफ इंडिया (ट्राय)च्या निर्देशानुसार अटींसह नव्या दरपत्रकानुसार जानेवारी महिन्यापासून केबल प्रक्षेपणासाठी पॅकेजची नोंदणी सुरूआहे; परंतु अद्याप ३० टक्के लोकांनीच केबलची नवीन पॅकेज घेतली आहेत. याबाबत ग्राहकांमध्ये अनास्था असून, विविध कारणे सांगून त्यांच्याकडून चालढकल केली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे केबलचालकांची घालमेल वाढली आहे.

‘ट्राय’ने एमआरपी अ‍ॅक्टअंतर्गत नव्याने केबल दर निश्चित करून ग्राहकांनाच प्लॅन निवडण्याची मुभा देण्याचे धोरण जाहीर केले आहे. जानेवारी महिन्यापासून याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवीन धोरणामुळे केबलच्या चॅनेल पॅकेजसाठी ग्राहकांना २५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात बी न्यूज व एस न्यूजचे मिळून सुमारे साडेसहा लाख केबल कनेक्शनधारक आहेत. यामध्ये बी न्यूजचे सुमारे पाच लाख, तर एस न्यूजचे दीड लाख कनेक्शनधारक आहेत. यातील अद्याप ३० टक्केच म्हणजे सुमारे २ लाख लोकांनीच नवीन पॅकेज घेतले आहे. जानेवारीपासून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचे हे चित्र आहे.सरकार नियम बदलणार असून, पूर्वीप्रमाणेच केबल सुरूराहणार आहे, या भरवशावर अजून ग्राहक आहेत. तसेच दहावीसह शालेय परीक्षा सुरूअसल्याने मुलांची अडचण नको म्हणूनही ग्राहकांकडून केबलचे पॅकेज घेण्याकडे कानाडोळा केला जात आहे. केबलचालकांकडून भेटीगाठी घेऊन नवीन पॅकेजसंदर्भात माहिती दिली जात असली, तरी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. जुन्या केबलचे प्रक्षेपण हे ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे; परंतु या केबलवर पे चॅनेल दिसत नसून, केवळ चार ते पाच राष्टÑीय चॅनेल्स दिसत आहेत. परीक्षेचे कारण पुढे करत ग्राहकांकडून होत असलेला कानाडोळा केबल चालकांची मात्र घालमेल वाढवीत आहे. साधारण एप्रिलअखेरपर्यंत असेच चित्र राहण्याची स्थिती आहे. 

केबलचे नवीन पॅकेज घेण्याबाबत ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. परीक्षांसह विविध कारणे सांगून ग्राहकांकडून चालढकल केली जात आहे. ‘ट्राय’च्या धोरणानुसार ३१ मार्चपर्यंत नवीन पॅकेज ग्राहकांनी घेणे गरजेचे आहे.- प्रकाश महाडिक, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केबल आॅपरेटर संघटना.केबलची पूर्वीची एका रकमेत सर्व चॅनेलची पद्धत सोईस्कर व किफायतशीर होती; परंतु नव्याने आलेल्या पॅकेज पद्धतीमुळे ग्राहकांच्या चॉईसवर गदा आली आहे. जादा पैसे आणि मर्यादित चॅनेल अशी ही पॅकेज पद्धत ग्राहकांसाठी सोईस्कर दिसत नाही.- उत्तम पाटील, केबल ग्राहक