शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

जातीच्या दाखल्यावर शासनाचा नवा आदेश

By admin | Updated: January 11, 2017 00:57 IST

दाखले सहा महिन्यांत मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, आयुक्तांवर

विश्वास पाटील --कोल्हापूर  -स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित प्रवर्गातून जे सदस्य निवडून येतात त्यांना सहा महिन्यांच्या आत संबंधित जात पडताळणी समितीकडून जातीचे दाखले मिळवून देण्याची जबाबदारी आता शासनाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांच्यावर टाकली आहे. त्यासंबंधीचा शासन आदेश मंगळवारी नगरविकास विभागाने काढला. सहा महिन्यांत दाखला दाखल न केल्यास निवडून आलेल्या सदस्यांचे पद रद्द होणार आहे; परंतु जात पडताळणी समित्यांकडूनच हे दाखले लवकर मिळत नाहीत; त्यामुळे अडचण होत होती, त्यावर मार्ग म्हणून शासनाने त्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व आयुक्त या अधिकाऱ्यांवर टाकली आहे.राज्यात आता नव्याने होणाऱ्या १० महापालिका, २६ जिल्हा परिषदा व २९६ पंचायत समितीच्या निवडणुकीत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या दोन अधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या सर्व सदस्यांची नावे व त्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार अनुदेय असलेली सहा महिन्यांची मुदत संपुष्टात येण्याचा दिनांक याबाबतची माहिती तयार करून हा सर्व तपशील संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या तत्काळ निदर्शनास आणून द्यावी. त्याचप्रमाणे अशा प्रकरणांचा निपटारा विहित मुदतीत होण्याच्या अनुषंगाने संबंधित समित्यांकडे आवश्यक पाठपुरावा करण्यात यावा, असे या आदेशात म्हटले आहे. हा आदेश (एमसीओ-२०१६ / प्र.क्र. ३१३ /नवि -१४, दि. १० जानेवारी २०१७) नगरविकास विभागाचे सहसचिव ज. ना. पाटील यांनी काढला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा अधिनियम, २०१५ (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३-२०१५) अन्वये १९६५ च्या अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या व ज्यांची अर्ज भरण्याची शेवटची मुदत ३१ डिसेंबर २०१७ किंवा त्यापूर्वीची असेल, अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत यांचा पुरावा अर्जासोबत सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे; परंतु या सदस्यांनी निवडून आलेल्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची तरतूद या अधिनियमात आहे. जात प्रमाणपत्र मुदतीत न दिल्यास संबंधित उमेदवाराचे सदस्यत्व रद्द होणार असेल तर हे प्रमाणपत्र मुदतीत देण्याची जबाबदारी जात पडताळणी समितीची आहे; परंतु सध्या हे प्रमाणपत्र मुदतीत मिळत नाही. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे निवडून आलेले सदस्य या समितीकडे बोट दाखवून बाजूला राहत होते; परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना तसे करता येणार नाही. मग हे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनीच त्यात लक्ष घालावे असे शासनाने सुचविले आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत मिळाले नाही म्हणून सदस्याचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे अनेक प्रकरणांत स्पष्ट होत होते. अशा गैरप्रकारांना आता चाप बसणार आहे. या निर्णयामुळे निवडणुकीसाठी जात बदलून आरक्षित प्रवर्गातून निवडून येणाऱ्यांनाही लगाम बसणार आहे.