शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगारासाठी नवे किमान वेतन

By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST

शासनाकडून नवीन अधिसूचना : कामगारांना अनुक्रमे सहा, सात व आठ हजार रुपये वाढ शक्य

इचलकरंजी : राज्यातील यंत्रमाग उद्योगामधील कामगारांसाठी शासनाने नवीन किमान वेतन जाहीर केले आहे. यानुसार कुशल कामगारांना प्रती महिना ६००० रुपये, अर्धकुशल कामगाराला ७००० रुपये व अकुशल कामगाराला ८००० रुपये अशी वाढ मिळेल. ही अधिसूचना उद्योग-ऊर्जा व कामगार मंत्रालयाने यंत्रमाग कामगार किमान वेतनप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये सादर केली असल्याची माहिती याचिकाकर्ते लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेच्यावतीने ए. बी. पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांना जानेवारी १९८६ नंतर गेली २८ वर्षे शासनाने किमान वेतन जाहीर केलेले नव्हते. लालबावटा कामगार संघटनेसह अनेक संघटनांनी किमान वेतनासाठी वारंवार आंदोलने केली. न्याय मागण्यासाठी वेगवेगळ््या पातळीवर त्याचा पाठपुरावा झाला. अखेर कामगार संघटनेतर्फे ए. बी. पाटील यांनी १३ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची न्यायाधीश मोहीम शहा व कुलाबावाला यांच्यासमोर ४ जानेवारीला सुनावणी झाली. यंत्रमाग कामगारांच्या किमान वेतनप्रकरणी ३१ जानेवारीपूर्वी शासनाने अधिसूचना काढावी आणि पुढील सुनावणीसाठी २ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहावे, असे आदेश उच्च न्यायालयाने जारी केला.न्यायालयाच्या आदेशानुसार उपसचिव दि. सा. रजपूत यांनी उपरोक्त अधिसूचना २९ जानेवारीला किमान वेतन अधिनियमास अनुसरून जारी केल्याचे पाटील यांना सांगितले. कामगार संघटनेच्यावतीने अ‍ॅड. प्रसन्न कुमार व अक्षय पाटील यांनी काम पाहिले. पत्रकार परिषदेसाठी कामगार नेते दत्तात्रय माने, आनंदराव चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोणाला किती लाभ शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार कुशल कामगाराला महापालिका क्षेत्रात १०,१०० रुपये, नगरपालिका क्षेत्रात ९,५०० रुपये व ग्रामीण क्षेत्रात ८,५०० रुपये इतके मूळ वेतन जाहीर झाले असून, सन २००१ चा महागाई भत्ता १०० निर्देशांक गृहीत धरून पुढे वाढीव निर्देशांकाप्रमाणे भत्त्यात वाढ होणार आहे. त्याप्रमाणे सध्या मूळ पगारात ३,७७० रुपये इतकी वाढ होईल. अशाच प्रकारे अर्धकुशल कामगाराला वरील उल्लेखनीय क्षेत्रानुसार अनुक्रमे ९,५०० रुपये, ९००० रुपये व ८००० रुपये आणि अकुशल कामगाराला अनुक्रमे ९००० रुपये, ८००० रुपये व ७५०० रुपये इतका दरमहा पगार आठ तास पाळीच्या कामासाठी मिळणार आहे. सध्या या कामगारांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळत असून, कुशल कामगारांना सुमारे ६००० रुपये, अर्धकुशल कामगारांना ७००० रुपये, तर अकुशल कामगारांना ८००० रुपये इतकी दरमहा वाढ मिळेल. मात्र, या नवीन अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटनांना आंदोलन करावे लागेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.