शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेची आत्महत्या; पती, सासºयाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिराजवळ राहणाºया नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ही माहिती समजताच शहरातच राहणाºया मोहिनी हिच्या नातेवाइकांनी लाटणे यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच पती प्रथमेश व सासरे सीताराम रामचंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी मंदिराजवळ राहणाºया नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिनी प्रथमेश लाटणे (वय २५) असे तिचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. ही माहिती समजताच शहरातच राहणाºया मोहिनी हिच्या नातेवाइकांनी लाटणे यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच पती प्रथमेश व सासरे सीताराम रामचंद्र लाटणे या दोघांना मारहाण केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत गावभाग पोलिसांत नोंद झाली आहे.याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या तिसºया वर्षात शिकणारी मोहिनी (मूळ रा. बंडगर माळ, इचलकरंजी) हिचा ६ जून २०१७ रोजी प्रथमेश याच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांतच मोहिनी हिने आत्महत्या केली.गुरुवारी सकाळी प्रथमेश याला कामावरून सोडून ती घरी परतली होती. त्यानंतर घरातील एका खोलीतील तुळईला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ ती बाहेर येत नसल्याने घरातील नातेवाइकांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिने गळफास लावून घेतल्याचे दिसले.शेजाºयांच्या मदतीने तिला सोडवून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी ती मृत झाली असल्याचे सांगितले. ही माहिती मोहिनी हिच्या बंडगर माळ येथील नातेवाइकांना समजताच त्यांनी लाटणे यांच्या घरात गर्दी केली. तेथे साहित्याची तोडफोड करीत पती प्रथमेश, सासरे सीताराम, सासू मालन यांना मारहाण केली. यामध्ये पती व सासरे जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मध्यस्थी करीत पोलीस बंदोबस्त तैनात केला.ंसासरच्या छळामुळेच आत्महत्या : नातेवाइकांचा आरोपलग्नापूर्वी मोहिनीचे उर्वरित शिक्षण पूर्ण करणार असल्याचे सासरच्या मंडळींना सांगितले होते; पण तिला शिकू दिले गेले नाही. तसेच वेळोवेळी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळेच मोहिने हिने आत्महत्या केली, असा आरोप मोहिनीच्या नातेवाइकांनी केला. याबाबत गावभाग पोलिसांत तक्रार नोंद करण्याचे काम सुरू होते. मोहिनीच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला असल्याने ती मामाकडे राहात होती. तिच्या अशा मृत्यूमुळे नातेवाइकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील आयजीएम रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.मृत्यूपूर्वी लिहून ठेवली चिठ्ठीमोहिनी हिने आत्महत्यापूर्वी इंग्रजीमध्ये चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ती चिठ्ठी नातेवाइकांच्या ताब्यात असून, यातील मजकूर समजू शकला नाही.