शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या इतिहास संवर्धनावर नव्याने चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

या लेखनाची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी यापुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि इतिहास संवर्धनाचा मास्टर प्लॅन तयार करणार ...

या लेखनाची दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी यापुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि इतिहास संवर्धनाचा मास्टर प्लॅन तयार करणार असून, यानंतरच्या टप्प्यात तज्ज्ञ समितीही नेमणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद बेरी यांनीही या लेखाची दखल घेतली आहे.

शहरभान चळवळीचे आर्किटेक्ट जीवन बोडके यांनीही याबाबत काही उपाययोजना सुचविल्या आहेत. शहरभान चळवळीच्यावतीने शहर विकासाचे जे मुद्दे मांडले आहेत, त्याला पूरक असा हा लेख आहे. विद्यापीठ हायस्कूलची जागा मंदिर परिसरात विलीन करण्याची गरज आहे. राजाराम हायस्कूलच्या इमारतीमध्ये संग्रहालय किंवा सिटी लायब्ररी उभारण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

बोडके म्हणाले, कोल्हापूर ही शाहूंची क्रीडानगरी, कलानगरी म्हणून ओळखली जाण्याची गरज आहे. कला, क्रीडा क्षेत्रात दर्जेदार रोजगार उपलब्ध होणार आहेत. दर्जेदार रोजगार उपलब्ध करण्यासाठी, गुणवत्तेचे जीवन जगण्यासाठीचे विकास आणि पर्यटन धोरण कोल्हापूरला गरजेचे आहे. खासदार संभाजीराजे यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास शहरभर चळवळ त्यांना सहकार्य करेल.

यानिमित्ताने कोल्हापूरच्या पर्यटन आणि ऐतिहासिक संवर्धनाची नव्याने चर्चा सुरू झाली असून, या लेखावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या याच पद्धतीने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

चौकट

महापालिका निवडणुकीत हा कळीचा मुद्दा

येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला हा मुद्दा मांडावा लागणार आहे. केवळ शाहू महाराजांचे नाव घ्यायचे आणि शहराचे नाव मोठे करणारे प्रकल्प राबविताना मात्र दारिद्र्य दाखवायचे हे आता राजकीय पक्षांनी बंद करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.